महापालिकेची आज सर्वसाधारण सभा
11:09 AM Oct 29, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
अपूर्ण कामांचा मुद्दा गाजणार
Advertisement
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 29 रोजी आयोजित करण्यात आली आहे. यावेळची सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. मागील वर्षभरात अपूर्ण असलेल्या कामांमुळे विकास आढावा बैठकीत नगरसेवकांनी नाराजीचा पाढा वाचला होता. आता सर्वसाधारण सभेतही अपूर्ण कामांबाबत जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारची सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी 11.30 वा. महापालिकेच्या सभागृहात सभा होणार आहे. सभेला नगरसेवकांसह आमदारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर नवीन विकासकामांना मंजुरीही मिळण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने सोमवारी सभागृहाची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनीही सर्व माहितीची जमवाजमव सुरू केली आहे.
Advertisement
Advertisement
Next Article