For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2026 मध्ये 6.7 टक्के राहणार जीडीपी दर : एस अँड पी ग्लोबलचा अंदाज

06:53 AM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
2026 मध्ये 6 7 टक्के राहणार जीडीपी दर   एस अँड पी ग्लोबलचा  अंदाज
Advertisement

2028 मध्ये विकास दर 7 टक्यावर शक्य: शहरी भागात मागणी घटणार

Advertisement

बेंगळूर :

रेटींग एजन्सी एस अँड पी ग्लोबल यांनी आशिया पॅसिफीक क्षेत्राच्या आर्थिक विकासाचा अंदाज पुन्हा वर्तविला आहे. भारताचा विकास दर व्यावसायिक वर्ष 2026 साठी 6.7 टक्के राहणार असल्याचा अंदाज संस्थेने व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2027 साठी देशाचा जीडीपी दर 6.8 टक्के इतका राहणार असल्याचेही म्हटले आहे.

Advertisement

अमेरिकेतील निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या निकालानंतर संस्थेने आपला अंदाज नव्याने सादर केला आहे. 2026 साठी आपला विकास दराचा अंदाज संस्थेने आहे तोच ठेवला आहे. महागडे व्याजदर त्याचप्रमाणे कमी आर्थिक नियोजनामुळे शहरी भागामध्ये मागणी कमी राहणार असल्याने वरील जीडीपी दराचा अंदाज संस्थेने वर्तविला आहे. पर्चेजिंग मॅनेजर इंडेक्स सध्याला चांगल्या स्थितीत असून सप्टेंबरमधली निर्मिती क्षेत्रातील कमकुवत वाटचाल आर्थिक विकासाचा वेग कमी करणारी ठरु शकते, असेही एजन्सीने म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2028 मध्ये जीडीपी दर 7 टक्क्यांपर्यंत वाढेल, असेही संस्थेला वाटते आहे.

एकदाच व्याजदरात कपात शक्य

खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असून याचा दबाव महागाईमध्ये दिसतो आहे. संस्थेच्या मते चालू व्यावसायिक वर्षामध्ये 31 मार्च 2025 पर्यंत केवळ एकदाच रेपो दरात कपात केली जाऊ शकते.

Advertisement
Tags :

.