कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जीडीपी अंदाजामध्ये घट

06:07 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एस अॅण्ड पी ग्लोबलने 0.2 टक्क्यांनी अंदाज कमी करुन 6.3 टक्के केला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जागतिक अनिश्चितता आणि टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर भारताला या निर्णयाचा  काहीसा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे  जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पी ग्लोबलने जीडीपीचा अंदाज शुक्रवारी 0.2 टक्क्यांनी कमी करून 6.3 टक्के केला आहे. याचे कारण अमेरिकेच्या टॅरिफ धोरणातील अनिश्चितता आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

‘ग्लोबल मॅक्रो अपडेट: यूएस ट्रेड पॉलिसीमधील बदल जागतिक विकासाला गती देतील’ या अहवालात एस अँड पीने म्हटले आहे की, वाढत्या संरक्षणवादी धोरणांचा कोणताही देश फायदा घेऊ शकत नाही.  अहवालानूसार, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये चीनचा विकास 2025 मध्ये 0.7 टक्क्यांनी कमी होऊन 3.5 टक्के आणि 2026 मध्ये 3 टक्के होण्याची अपेक्षा आहे. भारतासाठी, एस अँड पीने 2025-26 मध्ये 6.3 टक्के आणि 2026-27 मध्ये 6.5 टक्के जीडीपी वाढीचा अंदाज वर्तवला आहे. मार्चमध्ये, एस अँड पी ने आर्थिक वर्ष 2026 साठीचा जीडीपी वाढीचा अंदाज 6.7 टक्क्यांवरून 6.5 टक्के केला.

विनिमय दर आणि जागतिक प्रभाव

एस अँड पी ने असा अंदाज वर्तवला की, 2025 च्या अखेरीस भारतीय रुपया-अमेरिकन डॉलर विनिमय दर 88 पर्यंत पोहोचू शकतो, जो 2024 मध्ये 86.64 होता. अमेरिकन टॅरिफ धोरण जाहीर झाल्यापासून, रुपयात खूप अस्थिरता दिसून आली आहे आणि सध्या तो 84 च्या पातळीवर आहे.

एस अँड पी ने म्हटले आहे की, टॅरिफ धोरणाचा परिणाम आतापर्यंत कमी आत्मविश्वास निर्देशांक आणि आर्थिक मालमत्तेच्या कमी किमतींपुरता मर्यादित आहे. तथापि, वास्तविक अर्थव्यवस्थेवर परिणाम आता दिसू लागला आहे, कारण चीनमधून वस्तूंच्या शिपमेंटमध्ये अलीकडेच घट होऊ लागली आहे. अहवालात म्हटले आहे की अमेरिकन अर्थव्यवस्था 2025 मध्ये 1.5 टक्के आणि 2026 मध्ये 1.7 टक्के दराने वाढेल. एस अँड पी नुसार, अमेरिकन टॅरिफ धोरण तीन भागांमध्ये विभागले जाऊ शकते. भू-राजकीय स्पर्धांमुळे चीनसोबतचे व्यापार धोरण वेगळे होईल. युरोपियन युनियनसोबतचे व्यापारी संबंध गुंतागुंतीचे असू शकतात, तर कॅनडा व्यापार वाटाघाटींमध्ये अधिक कडक भूमिका घेऊ शकतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article