For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाझात शाळेवर हल्ला; 34 निर्वासितांचा मृत्यू

07:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
गाझात शाळेवर हल्ला  34 निर्वासितांचा मृत्यू
Advertisement

वृत्तसंस्था/गाझा सिटी

Advertisement

इस्रायलने गाझामधील अल-जौनी शाळेसह दोन घरांवर बुधवारी हल्ला केला. यात 34 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 19 महिला आणि 6 मुलांचा समावेश आहे. तसेच ‘यूएनआरडब्ल्यूए’च्या सहा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ही शाळा नुसिरत निर्वासित शिबिरातील युनायटेड नेशन्स डिझास्टर रिस्पॉन्स एजन्सीची होती. तेथे पॅलेस्टिनी निर्वासित राहत होते. निर्वासित राहत असलेल्या शाळेला लक्ष्य करण्यात आल्याच्या वृत्ताला संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही दुजोरा दिला आहे. यासंबंधी बोलताना त्यांनी अशाप्रकारचे कृत्य कोणत्याही प्रकारे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही दिला. या शाळेत 12 हजारांहून अधिक निर्वासित असून त्यात बहुतेक मुले आणि महिला आहेत. अशा आश्रयस्थानावर हल्ले करून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले जात आहे, ते आता थांबवण्याची गरज आहे, असे ते पुढे म्हणाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.