गौतम गंभीरच राहणार सर्व स्वरुपांत ‘टीम इंडिया’चे मुख्य प्रशिक्षक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने गौतम गंभीर क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपांत कायम राहतील आणि कोणताही बदल विचारात घेतला जात नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी गुऊवारी सांगितले.
भारताच्या कसोटी कामगिरीला सध्या मोठा फटका बसला असून एकेकाळी घरच्या मैदानावर जवळजवळ अजिंक्य मानल्या जाणाऱ्या संघाला आता सलग दोन मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. गेल्या हंगामात न्यूझीलंडविऊद्ध 0-3 असा व्हाईटवॉश सहन करावा लागला आणि अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविऊद्ध 0-2 असा पराभव पत्करावा लागलेला आहे. या दुहेरी धक्क्यांमुळे घरच्या परिस्थितीत भारताचा दीर्घकाळ चाललेला प्रभाव मोडला गेला आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील 16 महिन्यांतील हा तिसरा कसोटी मालिका पराभव आहे. एकेकाळी संघ ज्या स्वरुपात सर्वांत बळकट मानला जात होता तेच स्वरुप अचानक सर्वांत मोठा चिंतेचा विषय बनला आहे.
दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या ताज्या पराभवामुळे भारत चालू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अनिश्चित स्थितीत पोहोचला आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडविऊद्धच्या पराभवानंतर संघाची घसरण झाली होती. आताही या पराभवामुळे पुन्हा एकदा त्यांच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा धोक्यात आल्या आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील भारताचा घरच्या मैदानावरील हा दुसरा व्हाईटवॉश आहे. एकूणच पाहिल्यास क्रिकेटच्या सर्वांत दीर्घ स्वरुपातील त्यांचा हा तिसरा व्हाईटवॉश आहे.
भारताने कसोटी क्रिकेटमध्ये तीन वेळा घरच्या मैदानावर व्हाईटवॉश सहन केला आहे. 2000 मध्ये दक्षिण आफ्रिका टीम इंडियाचा त्यांच्याच मैदानावर व्हाईटवॉश करणारा पहिला संघ बनला होता. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली होती. गेल्या वर्षी न्यूझीलंडने 3-0 असा विजय मिळवला. ताज्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या मजबूत माऱ्याविरुद्ध संघर्ष करत राहिले. दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांची सरासरी फक्त 15.23 राहिली. 2002-03 मध्ये घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्यांची सरासरी 12.42 इतकी राहिली होती. त्यानंतर कोणत्याही कसोटी मालिकेतील टीम इंडियाची ही दुसरी सर्वांत कमी सरासरी आहे.