महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभेत गौरव गोगोई काँग्रेसचे उपनेते

06:03 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

के. सुरेश प्रतोदपदी  

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची लोकसभेतील पक्ष उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर 8 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले कोडिकुन्निल सुरेश यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती झाली आहे. विरुधुनगरचे खासदार मनिकम टागोर आणि किशनगंजचे खासदार डॉ. एम. जावेद यांची प्रतोदपदी नियुक्ती झाली आहे. काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी यासंबंधी ट्विट करत माहिती दिली आहे.

यासंबंधी एक पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठविण्यात आले आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना पत्र लिहून लोकसभेत काँग्रेस पक्षासाठी उपनेते, मुख्य प्रतोद अणि दोन प्रतोदांच्या नियुक्तीविषयी कळविले असल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले आहे.

यापूर्वी पक्षाने राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली होती. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे अन्य पक्ष लोकसभेत सर्वसामान्य लोकांचे मुद्दे प्रभावीपणे उपलब्ध करणार असल्याचे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

गौरव गोगोई आसामच्या जोरहाट मतदारसंघाचे खासदार आहेत. काँग्रेसच्या प्रभावी नेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. गौरव गोगोई हे काँग्रेसच्या वतीने संसदेत चर्चेत सहभागी होत असतात.  गौरव गोगोई हे आसामचे माजी अन् दिवंगत मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article