गॉफ, झेंग, व्हेरेव्ह यांना पराभवाचा धक्का
विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस : यास्त्रम्स्का, स्वायटेक, जोकोविच, फ्रिट्झ, सिलिक, केनिन दुसऱ्या फेरी
वृत्तसंस्था/ लंडन
विम्बल्डन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही अनेक मानांकित खेळाडूंना स्पर्धेबाहेर पडावे लागले असून त्यात तिसरा मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्ह, लॉरेन्झो मुसेटी, द्वितीय मानांकित कोको गॉफ, पाचवी मानांकित झेंग किनवेन, 15 वी मानांकित कॅरोलिना मुचोव्हा, मॅग्डालेना फ्रेच, मार्टा कोस्ट्युक यांचा समावेश आहे. एकूण 23 मानांकित खेळाडू स्पर्धेबाहेर पडले असून त्यात 13 पुरुष व 10 महिलांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत 23 मानांकित खेळाडू पराभूत होण्याच्या विक्रमाशी यावेळी बरोबरी झाली आहे. रिंडर्कनेच, टेलर फ्रिट्झ, नोव्हाक जोकोविच, डिमिट्रोव्ह, गेल मोनफिल्स, दायाना यास्त्रsम्स्का, रायबाकिना, इगा स्वायटेक, कॉलिन्स, केनिन यांनी दुसरी फेरी गाठली.
जर्मनीच्या तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हला पाच सेट्सच्या झुंजीत आर्थर रिंडर्कनेचने 7-6 (7-3), 6-7 (8-10), 6-3, 6-4 असा पराभवाचा धक्का दिला. चार तास 44 मिनिटे ही लढत रंगली होती. ग्रँडस्लॅम स्पर्धांत रिंडर्कनेचने आतापर्यंत 18 वेळा भाग घेतला होता. पण त्याला तिसऱ्या फेरीच्या पुढे एकदाही मजल मारता आली नव्हती. व्हेरेव्हने स्टुटगार्ट स्पर्धेत अंतिम फेरी तर हॅले ओपन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. पण त्याला हा जोम येथे टिकविता आला नाही. लॉरेन्झो मुसेटीला निकोलोझ बॅसिलाश्विलीने 6-2, 4-6, 7-5, 6-1, अलेक्झांडर बुबलिकला जॉमे मुनारने 6-4, 3-6, 4-6, 7-6 (7-5), 6-2 असा पराभवाचा धक्का दिला.
अन्य सामन्यात नोव्हाक जोकोविचने अलेक्झांड्रे मुनारचा 6-1, 6-7 (7-9), 6-2, 6-2, टेलर फ्रिट्झने एम्पेटशी पेरिकार्डचा पाच सेट्च्या झुंजीर 6-7 (6-8), 6-7 (8-10), 6-4, 7-6 (8-6), 6-2, जॅक ड्रेपरने सेबास्टियन बाएझचा 6-2, 6-2, 6-1, ग्रिगोर डिमिट्रोव्हने योशिहितो निशिओकाचा 6-2, 6-3, 6-4, गेल मोनफिल्सने युगो हम्बर्टचा 6-4, 3-6, 6-7 (5-7), 7-5, 6-2, बेन शेल्टनने अॅलेक्स बोल्टचा 6-4, 7-6 (7-1), 7-6 (7-4), मारिन सिलिकने राफाएल कॉलीननचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
सर्वांत धक्कादायक निकाल लागला तो महिला एकेरीत. द्वितीय मानांकित व अलीकडेच झालेल्या प्रेंच ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावलेल्या अमेरिकेच्या कोको गॉफला पहिल्या फेरीतच धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. तिला दायाना यास्त्रsम्स्काने 7-6 (7-3), 6-1 असे हरवित दुसरी फेरी गाठली. कॅरोलिना सिनियाकोव्हाने किनवेन झेंगचा 7-5, 4-6, 6-1, इलेना रायबाकिनाने एलिना अॅव्हानेसनचा 6-2, 6-1, बेलिंडा बेन्सिकने अॅलिसिया पार्क्सचा 6-0, 6-3, सोफिया केनिनने टेलर टाऊनसेंडचा 7-6 (7-5), 6-2, अॅनास्तेशिया झाखारोव्हाने व्हिक्टोरिया अझारेन्काचा 6-2, 2-6, 6-1, मायरा अँड्रीव्हाने मायर शेरिफचा 6-3, 6-3, इगा स्वायटेकने पॉलिना कुडरमेटोव्हाचा 7-5, 6-1, मारिया साकेरीने अॅना ब्लिन्कोव्हाचा 6-4, 6-4, डॅनियली कॉलिन्सने कॅमिला ओसोरिओचा 6-3, 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.