For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वायटेकला हरवून गॉफ अंतिम फेरीत

06:07 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वायटेकला हरवून गॉफ अंतिम फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था / माद्रीद

Advertisement

2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या माद्रीद मास्टर्स खुल्या पुरुष आणि महिलांच्या 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अमेरिकेच्या कोको गॉफने विद्यमान विजेत्या पोलंडच्या स्वायटेकचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे पुरुषांच्या विभागात नॉर्वेच्या कास्पर रुडने रशियाच्या मेदव्हेदेवला पराभवचा धक्का दिला.

महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या तृतिय मानांकित कोको गॉफने पोलंडच्या विद्यमान विजेत्या इगा स्वायटेकचे आव्हान 6-1, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. आता साबालेंका आणि स्विटोलिना यांच्यातील विजयी खेळाडू बरोबर गॉफची अंतिम फेरीसाठी लढत होईल.

Advertisement

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नॉर्वेच्या कास्पर रुडने रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेव्हचा 6-3, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये 63 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. क्लेकोर्टवरील स्पर्धेत नॉर्वेच्या कास्पर रुडने बेसलाईन खेळावर अधिक भर दिला होता. रुडचा उपांत्य फेरीचा सामना सेरुनडोलो बरोबर होणार आहे. सेरुनडोलोने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जेकुब मेन्सीकवर 3-6, 7-6 (7-5), 6-2 अशी मात करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. सेरुनडोलोने या स्पर्धेत जर्मनीच्या टॉपसिडेड व्हेरव्हला यापूर्वीच्या सामन्यात पराभवचा धक्का दिला होता. सदर स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी वीज प्रवाह सुरळीत नसल्याने पुन्हा काही सामने लांबणीवर टाकावे लागले.

Advertisement
Tags :

.