सर्वसामान्यांना गॅस दरवाढीचा तडाखा
घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ : उज्ज्वला योजनेतील ग्राहकांनाही नियम लागू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या आणि उज्ज्वला योजना लाभार्थींच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठाच फटका बसला आहे. या निर्णयामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना आता प्रत्येक गॅस सिलिंडरमागे 550 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांनाही 50 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. सध्या सर्वसामान्यांसाठीच्या गॅस सिलिंडरची किंमत 800 रुपये ते 820 रुपये इतकी आहे. या दरात 50 रुपयांची वाढ केल्यामुळे आता घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकांना 850 ते 870 रुपये मोजावे लागतील.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सोमवारी सायंकाळी दरवाढीसंबंधी माहिती दिली. सरकारी अधिसूचनेनुसार, नवीन किमती आज मध्यरात्रीपासून म्हणजेच 8 एप्रिलपासून लागू होत आहेत. या वाढलेल्या किमती सामान्य आणि अनुदानित दोन्ही श्रेणीतील ग्राहकांना लागू असतील. यापूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती. याचा फटका थेट ग्राहकांना बसणार नसला तरी घरगुती गॅस सिलिंडर दरात झालेल्या वाढीचा बोजा सर्व देशवासियांना सहन करावा लागणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांसोबतच उज्ज्वला योजनेअंतर्गत उपलब्ध असलेला सिलिंडरही आता 50 रुपयांनी वाढला आहे.
दर पंधरवड्याला आढावा घेणार
केंद्र सरकारने ही दरवाढ करताना एक अप्रत्यक्ष दिलासा सर्वसामान्यांना दिला असून ही दरवाढ प्रदीर्घ काळासाठी नसल्याचे संकेत दिले आहेत. दर दोन आठवड्यांच्या नंतर स्थितीचा आढावा घेण्यात येणार असून स्थिती अनुकूल असल्यास ही दरवाढ मागेही घेतली जाऊ शकते, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर लक्ष
सध्या अमेरिकेच्या करप्रणालीमुळे जगात आंतरराष्ट्रीय समीकरणे नव्याने मांडली जात आहेत. प्राप्त परिस्थितीत कच्च्या इंधन तेलाचे दर उतरले आहेत. तरीही ही गॅस दरवाढ का करण्यात आली, या प्रश्नाचे उत्तरही पुरी यांनी दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात जरी पेट्रोलियमच्या किमती उतरत असल्या, तरी पेट्रोलियम कंपन्यांना झालेला आजवरचा एकत्रित तोटा 43 हजार कोटी रुपयांचा आहे. त्याची काही प्रमाणात भरपाई या दरवाढीमुळे होईल. मात्र, ही दरवाढ तात्पुरतीही असू शकेल, असे प्रतिपादन पुरी यांनी यावेळी केले.
खर्चाचे ओझे वाढणार
केंद्र सरकारच्या गॅसदरवाढीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. स्वयंपाकासाठी पर्यायी इंधन सोयीस्कर नसल्याने बहुतेकांना गॅसवरच अवलंबून रहावे लागत आहे. अशा स्थितीत ही दरवाढ सर्वसामान्यांवरचे खर्चाचे ओझे अधिकच वाढविणार आहे, अशीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. वाढत्या खर्चामुळे महिलांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत यापूर्वी कपात
घरगुती सिलिंडरच्या आधी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. 1 एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत 41 रुपयांनी कमी करण्यात आली होती. इंडियन ऑइलने त्याची किंमत 41 ते 45 रुपयांनी कमी केली होती. सुधारित दरांमुळे एप्रिल महिन्यापासून दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 1,803 रुपयांऐवजी 1,762 रुपयांना