कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नंदगड येथे गॅस सिलिंडरचा स्फोट : पाचजण जखमी

12:31 PM Feb 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऐन यात्रेच्या काळात स्फोट झाल्याने घबराट

Advertisement

प्रतिनिधी / खानापूर

Advertisement

नंदगड येथील जनता कॉलनी येथील रघुनाथ मादार यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन पाचजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. ऐन महालक्ष्मी जत्रेच्या काळात सिलिंडरचा स्फोट झाल्याने जनता कॉलनीत एकच गेंधळ उडाला होता. शेजाऱ्यांनी पाण्याचा मोठ्या प्रमाणात शिडकाव केल्याने मोठा अनर्थ टळला असून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

नंदगड येथे 12 तारखेपासून लक्ष्मी देवीची यात्रा सुरू झाली आहे. मुख्य यात्रेला रविवारपासून सुरुवात झाल्याने स्नेहभोजनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे. जनता कॉलनीमध्ये रघुनाथ मादार यांच्या घरात स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने स्वयंपाक करत असलेले रघुनाथ मादार, नागराज कोलकार, मष्णू कांबळे, मनीषा कांबळे व आराध्या कांबळे हे पाचजण जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक सी. एस. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमींना तातडीने नंदगड येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले. जखमींवर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत एच. पी. कंपनीचे सिलिंडर वितरक असलेले तालुका मार्केटींग सोसायटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर निलजकर माहिती देताना म्हणाले, सिलिंडरचा स्फोट झाल्याचे समजताच आम्ही मेकॅनिकला घेऊन घटनास्थळी पाहणी केली आहे. या ठिकाणी बैलहोंगल विभागाचे डीवायएसपी रवि नाईक यांनीही भेट देऊन पाहणी केली आहे. स्फोट झालेले सिलिंडर आणि शेगडीची पाहणी केली असता स्फोट कशामुळे झाला, याची तपासणी करण्यासाठी एचपी कंपनीकडून तज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तज्ञांच्या अहवालानंतरच सिंलिडर स्फोटाचे कारण स्पष्ट होणार आहे. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असून कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे निलजकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article