महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गरुड कमांडोची गुजरातमध्ये आत्महत्या

06:31 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ड्युटीवर असताना सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने झाडली गोळी

Advertisement

वृत्तसंस्था/ कच्छ

Advertisement

भारतीय हवाई दलाच्या स्पेशल फोर्स युनिटच्या कमांडोने गुजरातमधील कच्छ येथील एअर फोर्स स्टेशनमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. ही घटना 16 नोव्हेंबर रोजी घडली असून आत्महत्या करणारा कमांडो नाईट ड्युटीवर होता. योगेश कुमार महतो (वय 23) असे मृताचे नाव असून तो झारखंडचा रहिवासी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महतो नामक कमांडोने 16 नोव्हेंबरच्या सकाळी ड्युटीवर असताना आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडली. यावेळी तो भुज येथील आयएएफ स्टेशनवर ड्युटीवर तैनात होता. आत्महत्या करणारा कमांडो आर्थिक संकटातून जात असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. तसेच आपल्या आईच्या प्रकृती अस्वास्थ्यासह इतरही काही कौटुंबिक समस्या असल्यामुळे या जवानाने आत्महत्येचे पाऊल उचलले. सध्या तो भूज एअर फोर्स स्टेशनवर गरुड कमांडो म्हणून भारतीय हवाई दलात तैनात होता. आत्महत्या केलेल्या सैनिकाने लीडिंग एअरक्राफ्ट्समनची रँक धारण केली होती. तसेच तो विशेष युनिटचा भाग असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article