महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रात्रीत होतो कचरा अदृश्य

07:00 AM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगातील सर्व देशांमध्ये आज सर्वात महत्वाची समस्या कोणती असेल, तरी कचऱ्याची आहे. विकसीत देशांनाही कचऱ्याचे व्यवस्थापन करताना नाकी नऊ येतात. भारतासारख्या देशांमध्ये शहरांमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे असलेले दिसून येतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, हा स्थानिक प्रशासनांसमोरचा सर्वात गंभीर प्रश्न असतो. शहरांचे सारे सौंदर्य कचऱ्यामुळे मार खाते.  तथापि, जगाच्या पाठीवर सिंगापूर नावाचा देश असा आहे, की ज्याने कचऱ्याच्या या समस्येवर एक अद्भूत उपाय शोधला आहे. या देशातील जवळपास सर्व कचरा रातोरात अदृष्य केला जातो. अर्थात, हा काही चमत्कार नाही. कचरा रात्रीतल्या रात्रीत अदृष्य होणे, याचा अर्थ असा आहे, की त्याची अत्यंत वेगवान पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. प्रदूषणमुक्त पद्धतीचा यासाठी उपयोग केला जातो.

Advertisement

या देशात प्रतिदिन हजारो टन कचरा निर्माण होतो. तो उचलण्यासाठी 2 हजार ट्रक्सची योजना करण्यात आली आहे. या ट्रक्स केवळ रात्री चालविल्या जातात. त्यामुळे दिवसा वाहतुकीला कोणताही अडथळा होत नाही. रात्री गोळा केलेला हा कचरा एका मोठ्या बंकरमध्ये साठवला जातो आणि त्याच्यावर योग्य ती प्रक्रिया करुन त्याच्यापासून वीज निर्माण केली जाते. ही वीज या देशातील वस्त्यांमधील घरांना पुरविली जाते. कचरा व्यवस्थापनाची इतकी उत्तम व्यवस्था जगात अन्यत्र कोठेही नाही, असे अनेक तज्ञांचे मत आहे. कचरा नष्ट करण्याची ही प्रक्रिया ‘रिड्यूस, रीयूज, रिसायकल या संकल्पनेवर आधारीत आहे. कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी सिंगापूरचे प्रशासन मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करते. तथापि, कचऱ्याची वेळेवर विल्वेवाट लागल्याने नागरीकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास साहाय्य होते. त्यामुळे अंतिमत: नागरीकांच्या पैशाची बचतच होते. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी या देशात अनेक तंत्रज्ञानांचा उपयोग केला जातो. सर्व कचरा रात्रीच उचलला गेल्याने हा देश नेहमी अत्यंत स्वच्छ असल्याचे दिसून येते. नॅशनल एन्व्हायरमेंट एजन्सी नामक एक संस्था सिंगापूर प्रशासनाने क्रियान्वित केली असून तिच्याकडे कचरा व्यवस्थापनाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article