For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडिगोतील हिस्सेदारी गंगवाल यांनी केली कमी

06:26 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंडिगोतील हिस्सेदारी गंगवाल यांनी केली कमी
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

भारतातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांनी समभागांच्या विक्रीच्या माध्यमातून 11 हजार कोटी रुपयांची हिस्सेदारी विक्री केली आहे. 4714 प्रति समभागाप्रमाणे समभागांची विक्री त्यांनी कंपनीतील हिस्सेदारी कमी केली आहे.

29 ऑगस्ट रोजी कंपनीने समभागांची विक्री केली असून या विक्रीचे वैशिष्ट्या म्हणजे आयटीसी लिमिटेड आणि इंडसटॉवर यांच्यानंतर 2024 मधील गंगवालांचा तिसरा सर्वात मोठा ब्लॉक डिलअंतर्गतचा करार असल्याचे सांगितले जाते.

Advertisement

देशांतर्गत वाहतुकीत अव्वल

इंडिगो मधील गंगवालांनी आपली जवळपास 30 टक्के इतकी हिस्सेदारी कमी केली आहे. इंडिगो ही भारतातली सर्वात मोठी हवाई क्षेत्रातील कंपनी मानली जाते. जुलैमध्ये देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये 62 टक्के इतकी हिस्सेदारी कंपनीने राखली होती. दुसऱ्या नंबरवर असणाऱ्या एअर इंडियाची हिस्सेदारी 14 टक्के होती.

वर्षात समभागाचा 94 टक्के परतावा

इंडिगोच्या समभागाने एक वर्षामध्ये 94 टक्के इतका गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे. गेल्या एक आठवड्यामध्ये सहा टक्के आणि तीन महिन्यांचा विचार करता समभाग 14 टक्के वर चढला आहे.

Advertisement
Tags :

.