गँगस्टर सुंदर भाटीची कारागृहातून सुटका
जामिनावर मुक्तता : उत्तर प्रदेशात पुन्हा दहशतीचे चिन्हे
वृत्तसंस्था/ लखनौ, सोनभद्र
समाजवादी पक्षाचे नेते हरेंद्र प्रधान आणि त्यांचा सरकारी गनर भुदेव शर्मा यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड सुंदर भाटी याला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर सोनभद्र तुऊंगात बंदिस्त असलेल्या सुंदर भाटी यांची गुपचूप सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर गुंड सुंदर भाटी विमानाने वाराणसीहून थेट दिल्लीला गेला. त्याच्यावर खून, बेकायदेशीर खंडणी, खुनी हल्ला आदी गंभीर प्रकरणांचे 60 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
एकेकाळी ‘दहशती’चे दुसरे नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गँगस्टर सुंदर भाटीचा पश्चिम उत्तर प्रदेशात प्रचंड प्रभाव होता. ग्रेटर नोएडातील घनघौला गावातील कुख्यात सुंदर भाटीने जवळपास 30 वर्षे आपले साम्राज्य निर्माण केले होते. राजकीय वर्तुळात त्यांचा चांगला प्रभाव होता. त्याच्यावर 60 हून अधिक गुन्हे दाखल असून त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यासह अनेक गुह्यांचा समावेश आहे. हरेंद्र प्रधान हत्या प्रकरणात तो तुऊंगात होता. आता 20 वर्षांनंतर त्याची तुऊंगातून सुटका झाली आहे.
हरेंद्र प्रधान यांच्या हत्येप्रकरणी सुंदरसिंग भाटी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो सोनभद्र तुऊंगात होता, आता त्याची सुटका झाली आहे. सुंदर भाटीचे नाव अतिक-अश्र्रफ हत्याकांडाशीही जोडले जात असल्याचे सांगितले जात आहे. अतिक अहमदच्या गोळीबारातील आरोपी सनी सिंग हा हमीरपूर तुऊंगात सुंदर भाटीसोबत बंदिस्त होता. अशा परिस्थितीत सुंदर भाटीचा अतिक हत्या प्रकरणाशी संबंध असल्याची अटकळ बांधली जात होती. परदेशातून बेकायदेशीरपणे आणलेले अतिकच्या हत्येतील जिगाना पिस्तूल जप्त करण्यात आले. सुंदर भाटी टोळीने ते पिस्तूल पुरवले होते, असा अंदाज होता.
गुन्हेगारीच्या जगात येण्यापूर्वी सुंदर भाटी बुलंदशहरमध्ये वाहतूक कंत्राटदार म्हणून परिचित होता. त्यानंतर तो नेत्यांच्या संपर्कात राहून गुन्हेगारी कारवाया करू लागला. सुंदर भाटीलाही राजकारणात येण्याची इच्छा होती, पण त्याच दरम्यान नरेश भाटी जिल्हा पंचायत अध्यक्ष झाले. सुंदर आणि नरेश हे पहिले साथीदार होते. त्यानंतर सुंदरने नरेश भाटी यांची हत्या केल्यानंतर तो गंभीर गुन्हे करत राहिला.