कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, उत्तरप्रदेश पोलीस अलर्ट मोडवर!
कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारीवर गेल्या १४ तासांपासून ९ डॉक्टरांची टीम उपचार करत होती.कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारी याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो तुरुंगात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. मुख्तार अन्सारीवर गेल्या १४ तासांपासून ९ डॉक्टरांची टीम उपचार करत होती. मात्र, त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गँगस्टर मुख्तार अन्सारी हा उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होता. मुख्तार अन्सारीला २०२२ मध्ये शिक्षा झाली होती. त्यानंतर पुन्हा दोन प्रकरणात अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मुख्तार अन्सारीवर ६१ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. बांदा, आणि गाजीपूर भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.