महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मंत्री हेब्बाळकर यांच्याकडून तलावाचे गंगापूजन

10:50 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हिरेबागेवाडी येथील सिद्दनभावी तलावाचे बुधवारी गंगापूजन करण्यात आले. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजन झाले. गंगापूजनानंतर लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, हिरेबागेवाडी परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. या मागणीची पूर्तता झाली आहे. सिद्दनभावी तलाव भरला आहे. त्याचे गंगापूजन करण्यात आले आहे, याचा आपल्याला आनंद वाटतो. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. नदी-नाले, धरणे भरली आहेत. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. सिद्दनभावी तलावात पाणी साठल्यामुळे कूपनलिकांमधून पाणी वाढणार आहे. भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. जनावरांना व परिसरातील नागरिकांनाही त्याचा उपयोग होणार आहे.

Advertisement

यापूर्वी आपण तलाव भरण्याचे आश्वासन दिले होते. तो शब्द पूर्ण करण्यात आला आहे. 19 कोटी रुपये खर्चातून या परिसरातील तलावात पाणी भरण्यात आले आहे, असेही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. हिरेबागेवाडी येथील 80 एकर जमीन राणी चन्नम्मा विद्यापीठासाठी दिली आहे. मुख्यमंत्री व उच्चशिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून मल्लय्या डोंगर परिसरात शेतकऱ्यांना दहा एकर जमीन मिळवून देण्यात येणार आहे. याच डोंगरावर मल्लिकार्जुनचे मंदिर उभारण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हिरेबागेवाडी येथे मोरारजी देसाई निवासी शाळा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, उळवाप्पा आज्जा, गंगाय्या स्वामीजी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सी. सी. पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष स्मिता पाटील, उपाध्यक्ष पुष्पा नायकर, सुरेश इटगी, गौसमोद्दीन जालीकोप्प, अनिल पाटील, श्रीकांत भरमण्णवर, अडिवेश इटगी, पडीगौडा पाटील, शिवू हळेमनी यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article