For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

टोळीयुद्ध आता थेट सोशल मिडीयावर ! सोशल मिडीयावर स्टेटस, व्हिडीओ ठेवून आवाहन देण्याचा प्रयत्न

11:54 AM Dec 23, 2023 IST | Abhijeet Khandekar
टोळीयुद्ध आता थेट सोशल मिडीयावर   सोशल मिडीयावर स्टेटस  व्हिडीओ ठेवून आवाहन देण्याचा प्रयत्न
Gang war On Social Media

कळंबा कारागृहातील व्हिडीओ नंतर घटना अधोरेखीत

आशिष आडिवरेकर कोल्हापूर

वर्चस्ववादातून टोळीयुद्ध आणि यातून होणाऱ्या मारामाऱ्या आणि त्यानंतर पडणारे मुडदे आता थेट सोशल मिडीयावर जावून पोहोचले आहेत. शहरातील सराईत गुंडाकडून प्रतिस्पर्ध्यांना थेट आता सोशल मिडीयाच्या माध्यमातून आव्हान देवून खुन्नस काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातून कोल्हापूरातील गँगवॉर आता थेट सोशल मिडीयावर जावून पोहोचला आहे.

Advertisement

वर्चस्ववाद आणि टोळीयुद्ध कोल्हापूरला काही नवीन नाही. या टोळीयुद्धातून पडलेले मुडदेही कोल्हापूरने पाहिले आहेत. मध्यल्या काही वर्षात कोल्हापूरात टोळीयुद्ध शांत होते. मात्र आता पुन्हा हे टोळीयुद्ध डोके वर काढत आहेत. काही कुख्यात टोळक्यांचे म्होरके जरी जेरबंद असले तरी, त्यांचे समर्थक मात्र आता डोके वर काढत आहे. हे समर्थक आता सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह झाले असून त्याद्वारे प्रतिस्पर्धी टोळीला आवाहन देण्याचे काम सुरु आहे. कुमार गायकवाड याचा खून झाल्यानंतरही त्याचे सोशल मिडीया अकाँट अॅक्टीव्ह असून किंग ऑफ कोल्हापूर के. एम., तर आर. सी गँग, एस. एम. बॉईज, यासह विविध नावाने सोशल मिडीयावर सध्या वॉर सुरु आहे.

सोशल मिडीयासाठी स्वतंत्र्य यंत्रणा
कोल्हापूरातील टोळ्यांकडून सोशल मिडीया अकाँट हँडल करण्यासाठी स्वतंत्र्य यंत्रणा कार्यान्वीत असल्याचे दिसून येत आहे. टोळीचा म्होरक्या जरी कारागृहात असला तरी त्यांचे पंटर सोशल मिडीयावर आपल्या म्होरक्याला अॅक्टीव्ह ठेवून वसुलीचे काम करताना दिसत आहेत. कुख्यात टोळ्यांकडून सध्या सोशल मिडीया हँडल करण्यासाठी स्वतंत्र्य पंटर ठेवल्याचे दिसत आहे. आपल्या टोळीच्या समर्थकांकडे आपली पोस्ट पोहोचविण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहेत. यातून मॅसेज देवून काही विपरीत घटना घडत आहेत. पोस्ट व्हायरल करुन आपल्या पोस्टला जास्तीत जास्त फॉलोअर्स देण्याकडेही या यंत्रणेचे बारीक लक्ष असते.

Advertisement

स्टेटस ठेवून खून
व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम आणि ट्वीटरसह अन्य सोशल मिडीयावर स्टेटस ठेवून खून केल्याच्या घटना कोल्हापूरात घडल्या आहेत. कुमार गायकवाड याचा खून करण्यापूर्वी संशयीतांनी सोशल मिडीयावर चिथावणीखोर पोस्टकरुन खून केल्याचे तपासात निष्पण्ण झाले होते. याचसोबत अशा अनेक घटनांमधून सोशल मिडीयावर चिथावणीखोर पोस्टचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

खुन्नस, ईर्ष्या आणि बरच काही....
काय गेम करायच्या त्या करुन घ्या... मी गेम केली म्हणजे सोसणार नाही... शब्द हाय आपला...., वक्त का इंतजार करो जनाब नजारा देखणे लायक बना देंगे ...तलवारीची गरज आम्हाला कधी पडलीच नाही.... कारण वाघासारखे मित्र असतानाच शत्रुची आमच्यावर कधीच नजर पडली नाही..., किंग ऑफ कोल्हापूर के. एम. अशा विविध पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
शहरासह जिह्यातील टोळ्यांच्या समर्थकांकडून सोशल मिडीयावर चिथावणीखोर पोस्ट व्हायरल करण्याचे काम सुरु आहे. याबाबत सायबर सेलकडे काही तक्रारी आल्या आहेत. यामुळे समाजामध्ये अशांतता प्रस्थापित करण्याचे काम काही घटकांकडून जाणीवपुर्वक सुरु आहे. सायबर सेलला जिह्यातील व शहारातील कुख्यात गुंडाची यादी तयार करुन त्यांच्या सोशल मिडीयावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 महेंद्र पंडीत पोलीस अधीक्षक

Advertisement
Tags :
×

.