महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका 10 वर्षीय मुलीवर 10 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. सामूहिक बलात्कारापूर्वी आरोपींनी या मुलीला बळजबरीने अमली पदार्थ भरविले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत 10 आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलीचे 25 जून रोजी शहराच्या कच्चिकुडा या भागातून अपहरण करण्यात आले होते. नरेश आणि विजय कुमार यांनी अन्य एका मित्राच्या मदतीने पीडित मुलीशी मैत्री केली होती. यानंतर आरोपींनी तिचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेला आरोपींनी अनेकदा मारहाण देखील केली होती. आरोपींचे मोबाइल, सिमकार्ड, दुचाकीसमवेत अनेक वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. सर्व आरोपींना 29 जून रोजी अटक करण्यात आली होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article