कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अट्टल चोरट्यांची टोळी जेरबंद

12:29 PM Aug 01, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

दहिवडी :

Advertisement

माण तालुक्यातील दहिवडी व परिसरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

अटक केलेल्यांमध्ये प्रविण बापुराव चव्हाण, प्रशांत बापुराव चव्हाण, विकास तानाजी चव्हाण, सुमीत रामचंद्र पाटोळे, अनिल नंदकुमार दळवी, मुकेश आबा अवघडे, सौरभ संतोष अवघडे, गोरख संजय चव्हाण, अजय आनंदा चव्हाण व एक विधीसंघर्ष बालक सर्व (रा. दहिवडी ता. माण) यांचा समावेश आहे.

याबाबत दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिलेली माहिती अशी की, दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या विहिरी वरील, बोअरवेलवरील मोटार, केबल चोरी, तसेच शासकीय धान्य गोडावुन व जिल्हा परिषद शाळेतील तांदूळ व गॅस टाकी, दहिवडी येथील सिध्दनाथ मंदिराजवळ असलेल्या तालमीतील व्यायम शाळेमधील साहित्य चोरी झाल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या.

या अनुषंगाने यामधील अज्ञात आरोपींचा दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे स्वत: त्यांच्या स्टाफसह शोध घेत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या विहिरीवरील, बोअरवेलवरील मोटार, केबल तसेच शासकीय धान्य गोडावुन व जिल्हा परिषद शाळेतील तांदूळ व गॅस सिलेंडर, दहिवडी येथील सिध्दनाथ मंदिरा जवळील तालमीतील व्यायाम शाळेमधील साहित्य चोरीमधील संशयित आरोपी यांची माहिती मिळाल्याने त्यांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले 9 गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून गुह्यात वापरलेली वाहने जप्त केली आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे, पोलीस हवालदार बापु खांडेकर, तानाजी काळेल, विजय खाडे, रामचंद्र गाढवे, नितीन धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, गणेश खाडे यांनी केलेली आहे..

अट्टल चोरट्यांच्या टोळीने दहिवडी परिसरातील शेतकरी व नागरिकांना अनेक दिवसापासून हैराण करून सोडले होते. या टोळीमुळे तालुक्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र दहिवडी पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करून 9 जणांना अटक केली. त्यामुळे पोलिसांचे संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article