डेटिंग अॅपद्वारे हनिटॅप करणारी टोळी गजाआड
बेंगळूरमध्ये कारवाई : सॉफ्टवेअर अभियंत्याची फसवणूक
प्रतिनिधी/ बेंगळूर
डेटिंग अॅपला बळी पडलेल्या सॉफ्टवेअर अभियंत्याची फसवणूक झाली आहे. हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकवून सॉफ्टवेअर अभियंत्याला ब्लॅकमेल करणाऱ्या युवतीसह सहा जणांच्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे. बेंगळूरच्या यलहंका येथील न्यू टाऊन पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली.
शरणबसप्पा, राजू माने, श्यामसुंदर, अभिषेक, बिरबल आणि संगीता अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी हनिट्रॅपमध्ये अडकवून सॉफ्टवेअर अभियंता राकेश रे•ाr याला 2 लाखांना लुटले होते. ‘पंबल’ या डेटिंग अॅपद्वारे संगीताने राकेश रे•ाrला आपल्या मोहजालात अडकविले. नंतर राकेशला बोलावून मद्यप्राशनास भाग पडले. त्याचवेळी इतर पाच आरोपी तेथे आले. संगीताने आपल्या बॅगमधून बेकिंग सोडा दाखवून राकेशला “तू ड्रग्ज सेवन करतोस?, तुला पोलिसांच्या ताब्यात देतो,” असे धमकावून 2 लाख रुपये उकळले.
या प्रकरणी राकेश रे•ाrने यलहंका न्यू टाऊन पोलीस स्थानकात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे तपास करत पोलिसांनी 6 जणांच्या मुसक्या आवळल्या. डेटिंग अॅपद्वारे या टोळीने आणखी काही जणांना फसविल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी या दिशेनही तपास सुरू केला आहे.