For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नशेखोर टोळक्याचा भररस्त्यात पोलिसांच्याबरोबर हुज्जत

03:40 PM Sep 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
नशेखोर टोळक्याचा भररस्त्यात पोलिसांच्याबरोबर हुज्जत
drug addicts fight with the police
Advertisement

दोन नशाबाज तऊण अटकेत; दोन नशेखोराचे पोलिसांच्या दहशत निर्माण पलायन; कळंब्यातील साई मंदिरालगत घडली घटना; टोळक्याच्या हुज्जतीचा व्हिडीओ व्हायरल

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या चार नशेखोर तरूणाच्या टोळक्याला अटकाव करण्यासाठी धावलेल्या पोलिसांच्या भिती घालून, त्यांच्या अंगावर धावून येवून, त्यांच्याशी गैरवर्तन करीत, शिवीगाळ कऊन, दगडाने मारण्याची धमकी दिल्याची घटना कळंबा (ता. करवीर) येथील साई मंदिरालगत बुधवारी रात्री घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी नशेखोर टोळक्यातील दोघांना पकडून अटक केली. अक्षय मांगले, नागेश पाटोळे (दोगे रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. तर पोलिसांच्यावर दहशत निर्माण कऊन पळून गेलेल्या दोघा नशेखोराची नावे समजली नाही. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुऊवारी गुन्हा दाखल झाला.

कळंबा साई मंदिरालगतच्या खाऊ गल्लीमधील रस्त्यावर चार नशेखोर तऊणाचे एक टोळक रस्त्यावर धिंगाणा घालीत रस्त्यावऊन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना मारहाण करीत होते. या प्रकाराबाबत एका व्यक्तीने 112 नंबरच्या हेल्पलाईनवर, घडत असलेल्या प्रकाराविषयी पोलिसांना माहिती दिली. या माहिती वऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दिगंबर रसाळ आणि पोलीस गाडी चालक सहाय्यक फौजदार प्रदिप नाकील व बंदोबस्तावरील होमगार्ड आदीचे एक पथक त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नशेखोर टोळक्याला समजावून सांगत शांत होण्याबाबत सांगत होते. यावेळी या टोळक्याने पोलिसांच्या बरोबर हुज्जत घालीत, मोठ-मोठ्याने शिव्या देवू लागले. तसेच चौघापैकी दोघे जण आम्ही कोणत्या पोलिसाला भित नाही. आमचे ऐकायचे, नाही तर दगड मारीन, अशी धमकी देवून, पोलिसांच्याबरोबर हुज्जत घालुन, त्यांच्याशी गैरवर्तन कऊन, रस्त्यावरच धिंगाणा घालू लागले. अशा धिंगाणा घालणाऱ्या दोघा नशेखोर तऊणांना पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली. तर दोघे नशेखोर तऊण पोलिसांच्यावर दशहत निर्माण कऊन पळून गेले. या नशेखोर टोळक्याचा पोलिसांच्या बरोबर हुज्जत घालीत, त्यांना धमकी देत असलेल्या घटनेची एक व्हिडीओ क्लिप गुऊवारी समाज माध्यमावर व्हायरल सुध्दा झाली आहे. या व्हिडीओ क्लिपची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतल्याने, या नशेखोर तऊणाच्या टोळक्याविरोधी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.