कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Ganeshotsav 2025: कुरुंदवाडमधील शेळके मशिदीत 87 वर्षांपूर्वी गणेशोत्सव, एकात्मतेचा संदेश देणारं ठिकाण

04:42 PM Sep 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कागदामध्ये शिकलगार वेशीत पिरापुढे मंडप घालून गणपती बसवल्याचीही नोंद आहे

Advertisement

By : मानसिंगराव कुमठेकर 

Advertisement

सांगली :

कुरुंदवाडमधील गणेशोत्सव हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो. या गावात पाच मशिदीमध्ये गणेश मूर्ती स्थापन केली जाते. मशिदीमध्ये गणेश मूर्ती स्थापन करण्याची ही परंपरा सुमारे 87 वर्षांपूर्वीची आहे. 1938 साली शेळके मशिदीत गणपती बसवण्यास परवानगी मिळाल्याचा कागद उपलब्ध आहे. याच कागदामध्ये शिकलगार वेशीत पिरापुढे मंडप घालून गणपती बसवल्याचीही नोंद आहे.

कुरुंदवाड शहर हे हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गणेशोत्सव आणि मोहरम सण हिंदू आणि मुस्लिम मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरे करतात. दोन्ही समाजातील लोक या सणांसाठी पुढाकार घेतात. शेकडो वर्षाची ही परंपरा आहे.

येथील गणेशोत्सव आणि मोहरम सण धार्मिक सलोखा व एकात्मतेचा संदेश देत आहेत. शहरातील पाच मशिदीत दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे सेवा केली जाते. पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा मुस्लिम बांधवानी आजही तितक्याच श्रद्धेने अबाधित ठेवली आहे.

आज शहरात कुडेखान बडेनाल साहेब मशीद, ढेपनपूर मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद आणि कारखाना मशीद या पाच मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. शहरातील या परंपरेचा मागोवा घेत गेलो तर, ही परंपरा सुमारे 87 वर्षापूर्वी सुरू झाल्याचे आढळते.

1938 मध्ये शेळके मशिदीत गणपती बसवण्याची परवानगी त्या वेळच्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी तत्कालीन कुरुंदवाड संस्थानिकांकडे मागितली होती. सदरच्या परवानगी संबंधीचे कागद आहेत. त्यानुसार सदरची शेळके मशीद ही हिंदू-मुस्लिम बांधवांनी वर्गणी काढून बांधल्याचे दिसते.

त्यामुळे मशिदीमध्ये गणपती स्थापन करणे दोन्ही धर्मियांना गैर वाटले नाही. तशी नोंदही सदर परवानगी अर्जात आहे. याच परवानापत्रात शिकलगार वेशीतील पिरांच्या मशिदीपुढे मंडप घालून गणपती उत्सव होत असल्याची सांगितले आहेत्याप्रमाणेच शेळके मशीद येथे गणेश उत्सव करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्यावर 27 ऑगस्ट 1938 रोजी चर्चा होऊन त्यास परवानगी मिळाल्याचे दिसते. त्यामुळे शेळके मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा ही 87 वर्षे मागे जाते. त्यानंतरच्या काळात काही वेळा गणेशोत्सव आणि मोहरम एकाच वेळी आले तरीही त्याचा परिणाम या दोन्ही उत्सवांवर झाला नाही.

एकाच ठिकाणी पीर आणि गणेश मूर्ती अशी स्थापना त्यावेळी या मशिदींमध्ये झाल्याचे दिसते. गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आल्याने शहरातील हिंदू-मुस्लीम समाजबांधवांनी एकत्रितपणे भक्तिमय वातावरणात हे सण साजरे केले, अशा नोंदी आहेत.

आजही ही परंपरा दोन्ही धर्मीय तितक्याच निष्ठेने जपत आहेत त्यामुळे दोन्ही धर्मातील सलोख्याचा वारसा अधिक दृढ होत आहे.त्यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी जातीय दंगली उसळल्या तरी कुरुंदवाडमधील ऐक्यावर त्याचा कधीच परिणाम झाला नाही. उलट मशिदीत होणाऱ्या गणपती प्रतिष्ठापनेमुळे दोन्ही समाजातील स्नेहबंध अधिक घट्ट झाले आहेत.

Advertisement
Tags :
#Ganesh Chaturthi#kurundwad#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacultural kolhapurGanesh Jayantiganeshotsav 2025shelake mashid
Next Article