महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्रामीण भागात गणेशमूर्ती घेताहेत आकार

11:53 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गणेशोत्सव 12 दिवसांवर : मूर्तिकारांची धडपड : रंग-सजावटीला वेग

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरासह ग्रामीण भागातील कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग पाहावयास मिळत आहे. घरगुती गणेश मूर्तींबरोबर सार्वजनिक गणेशमूर्तीही आकार घेऊ लागल्या आहेत. रंगकाम आणि सजावटीसाठी कारागीरांचे हात धडपडू लागले आहेत. विशेषत: केदनूर, मण्णिकेरी, हंदिगनूर, अतिवाड, बसुर्ते, कुद्रेमनी आदी गावांमध्ये मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे. विशेषत: विभक्त कुटुंबांची संख्या वाढल्याने साहजिकच घरगुती गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. घरोघरी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जात असल्याने लहान आकाराच्या मूर्तींनाही अधिक पसंती मिळू लागली आहे.

Advertisement

त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यशाळा आणि लोहार बांधवांकडे गणेशमूर्ती बुकिंगसाठी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. तालुक्यात अंदाजे 450 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यामुळे सार्वजनिक मूर्तींची मागणी अधिक आहे. अलीकडे बाहेरून मूर्ती आणण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानिक कारागीरांना फटका बसत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. मूर्तिकार शेवटच्या टप्प्यातील रंगकाम आणि इतर सजावट करू लागले आहेत. गणेशोत्सव जवळ येत आहे, तसतसे मूर्तिकार दंग होताना दिसत आहेत. आकर्षक आणि सुबक मूर्तींना मागणी अधिक आहे. त्याबरोबरच वेगवेगळ्या आकार आणि प्रतिमांमध्ये मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. काही गावांमध्ये कुंभार कारागीरांनी पारंपरिक पद्धतीने आपला हा व्यवसाय टिकवून ठेवला आहे.

कोरीव कामासाठी लगबग

घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. घरगुती 1500 तर सार्वजनिक 70 हून अधिक मूर्ती तयार केल्या आहेत. शेवटच्या टप्प्यातील रंग आणि कोरीव कामासाठी लगबग सुरू आहे. मागणी आणि पसंतीनुसार मूर्ती तयार करून दिल्या जात आहेत.

- शट्टू लोहार (मूर्तिकार, केदनूर)

घरगुती गणेशमूर्तींना मागणी

पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्ती तयार करतो. यंदा घरगुती गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. मात्र, बाहेरून आणण्यात येणाऱ्या मूर्तींमुळे फटका बसू लागला आहे. अलीकडे घरगुती गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. विविध आकारांमध्ये आणि प्रतिमांमध्ये मूर्ती साकारल्या आहेत.

- विनायक कुंभार (मूर्तिकार, बसुर्ते)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article