महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शरीरसौष्ठव स्पर्धेत गणेश पाटीलला दोन कांस्य

09:59 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : मालदीव येथे विश्व बॉडीबिल्डींग फेडरेशनच्या मान्यतेनुसार एशियन बॉडिबिल्डींग फेडरेशन आयोजित साऊथ एशियन शरीरसौष्ठव स्पर्धेत ज्युनियर व सिनियर गटात बेळगावचा शरीरसौष्ठवपटू गणेश राजु पाटील याने कांस्यपदक पटकावित बेळगावचे नाव शरीरसौष्ठव क्षेत्रात उज्ज्वल केले. मालदीव येथे वर्ल्ड बॉडिबिल्डिंग फेडरेशन व एशियन बॉडिबिल्डिंग फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या साऊथ एशियन बॉडिबिल्डिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बेळगाव, कर्नाटकचा शरीरसौष्ठव पटू गणेश राजु पाटील यांनी ज्युनियर गटात 75 किलो आतील वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारत कास्य पदक पटकाविले. तर याच स्पर्धेत वरिष्ठ गटात 70 किलो वजनी गटात भाग घेत अंतिम फेरीत मजल मारून कास्य पदक पटकाविले. एकाच स्पर्धेत दोन विभागात पदक पटकाविणारा गणेश हा बेळगावचा पहिला शरीरसौष्ठवपटू आहे.

Advertisement

यापूर्वी गणेशने केरळ येथे झालेल्या साऊथ इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत गणेशने आपल्या गटात चौथा क्रमांक पटकाविला होता. तर दिल्ली येथे झालेल्या ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावित. ज्युनियर मिस्टर इंडिया हा किताब पटकाविला होता. त्याची दखल घेऊन साऊथ एशियन स्पर्धेसाठी गणेश पाटीलची निवड झाली होती. या यशानंतर गणेश पाटील यांचे छत्रपती शिवाजी उद्यानात गणेश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून महाद्वार रोड, एसपीएम रोड व ताशिलदार गल्ली येथून गणेश पाटीलची मिरवणूक काढण्यात आली. कमी वयात एकाच स्पर्धेत दोन पदके पटकाविणारा गणेश पाटील हा पहिला शरीरसौष्ठवपटू ठरला आहे. त्याचा बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, कर्नाटक शरीरसौष्ठव संघटनेने कार्यकारी अध्यक्ष अजित सिद्दण्णवर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गणेश पाटीलचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी एम. गंगाधर, हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, बसवराज आरळीमट्टी, सुनील राऊत, अनंत प्रधान, राजू नलवडे, नूर मुल्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article