For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

लाल चौक, गांधी चौकात आयोजन : ‘जय श्रीराम’चा नारा : मशाल व दुचाकी रॅली

03:48 PM Jan 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
लाल चौक  गांधी चौकात आयोजन   ‘जय श्रीराम’चा नारा   मशाल व दुचाकी रॅली

श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठापणे निमित्त आ. पाटील यांच्या हस्ते महाआरती

इस्लामपूर प्रतिनिधी

माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्यासह हजारो स्त्री-पुऊष, युवक भाविकांच्या साक्षीने,’जय श्रीराम’च्या निनादात.. अत्यंत भक्तिमय वातावरणात इस्लामपूर येथील लाल चौक-गांधी चौकात प्रभू रामचंद्रांची महाआरती करण्यात आली. युवक राष्ट्रवादी व खेळाडूंची भव्य मोटार सायकल मशाल रॅली, भारतीय तिरंग्याच्या तीन रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला, तसेच राम-लक्ष्मण-सीता-हनुमान आदी वेषभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Advertisement

प्रभू राम हा आपणा सर्वांचा आहे, या भावनेने आपण जात-धर्म, व पक्षाच्या पलीकडचा विचार करून अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राण प्रतिष्ठेचे औचित्य साधून ही महाआरती करीत असल्याची भावना, आ.पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून 51 महिला भगिनींना चांदीचे नाणे भेट देण्यात आले. सकाळपासूनच शहराच्या काना-कोपऱ्यातून हजारो महिला लाल व गांधी चौकात एकत्र आल्या. येथे मोठ्या उत्साहात ‘श्रीराम, जय राम, जयजय राम’चा जप करण्यात आला. दरम्यान, युवक राष्ट्रवादीचे सचिन कोळी, स्वरूप मोरे, सागर जाधव, अभिजित कुर्लेकर, अभिजित पाटील, अभिजित रासकर, सूरज कचरे, राष्ट्रीय खेळाडू दर्शन पाटील यांच्यासह युवक राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते व खेळाडूंनी रामलिंग बेट व कारखाना श्रीराम मंदिरातून कोर्ट, आझाद चौक, गणेश भाजी मंडईतून लाल चौकात मोटार सायकल रॅली आणली.

येथे आ. पाटील यांनी रॅलीचे स्वागत केले. आ. पाटील यांच्या हस्ते रामेश्वर मंदिरात प्रभू रामचंद्रांची पूजा करण्यात आली. त्यानंतर लाल चौकात उभारलेल्या छोट्याशा व्यापीठावर उभा राहून त्यांनी आरती केली. यावेळी लाल चौक व गांधी चौक भाविक भक्तांनी खचाखच भरून गेला होता. आरती संपल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, अॅड. धैर्यशिल पाटील, रोझा किणीकर, उषा पंडीत मोरे, ऊपाली जाधव, वैशाली डांगे, सविता डांगे, आशाराणी पाटील, पुष्पलता खरात यांनी अतिशय उत्तम नियोजन केले.

Advertisement

प्रा. शामराव पाटील, आनंदराव मलगुंडे, पै. भगवान पाटील, दादासाहेब पाटील, संदीप पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, शंकरराव चव्हाण, प्रा.अऊणादेवी पाटील, सुस्मिता जाधव, कमल पाटील, प्राचार्य दीपा देशपांडे, जयश्री माळी, जयश्री पाटील, शुभांगी शेळके,सुनिता सपकाळ, शैलजा जाधव, योगिता माळी, मनिषा पेठकर, संगिता शहा, संजय पाटील (धनी) यांच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement

नारायण वाळवेकर, श्याम दंडगे, राम दंडगे, रविंद्र बेळगी, प्रमोद कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. राजारामबापू मिलिटरी स्कूल तसेच विद्या मंदीरच्या विद्यार्थी-खेळाडूंनी रॅली व संयोजनात भाग घेतला. सदानंद गाडगीळ (सांगली) यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :
×

.