खेळ जुनाच ओळख नवी ! केटलबेल
06:00 AM Nov 08, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
केटलबेल...म्हणजे केटलबेल लिफ्टिंग किंवा गिरेव्हॉय...या क्रीडाप्रकाराचा उगम रशियामध्ये झाला...त्यात वापरण्यात येतो ‘केटलबेल’ किंवा ‘गिर्या’ म्हणजे लोखंडी गोळा जो तळाशी सपाट असतो आणि हँडलसह येतो. तो विविध पद्धतीनं उचलण्याची क्रिया यात समाविष्ट राहते. थोडक्यात हा ‘वेटलिफ्टिंग’च्या धर्तीचाच प्रकार...
Advertisement
- मूलत: ‘केटलबेल’चं वजन ‘पूड’मध्ये ठरतं. ते मापनाचं एक युनिट, जे प्रामुख्यानं रशिया, युक्रेन व बेलारूसमध्ये वापरलं जातं. एक ‘पूड’ म्हणजे 16 किलोग्रॅम...
- पहिली केटलबेल क्रीडास्पर्धा 1948 मध्ये झाली आणि 1985 मध्ये काही नियम बदलल्यानं तसंच वजन श्रेणींची निर्मिती केल्यानं त्यात मोठे बदल पाहायला मिळाले...1992 मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या पतनानिशी दोन आंतरराष्ट्रीय केटलबेल महासंघांनी जन्म घेतला...‘आजीएसएफ’ (इंटरनॅशनल गिर्या स्पोर्ट फेडरेशन) आणि ‘आययूकेएल’ (इंटरनॅशनल युनियन ऑफ केटलबेल लिफ्टिंग)...
- या खेळात ‘स्पर्धात्मक केटलबेल’ वापरले जातात...पारंपरिक स्पर्धांतील त्यांचं वजन 16 किलो, 24 किलो आणि 32 किलो राहत असलं, तरी ‘स्पर्धात्मक केटलबेल’ हे 8 ते 48 किलो वजनांपर्यंतचे येतात...‘केटलबेल’ना वजनानुसार रंग दिलेले असतात...
- ‘केटलबेल’चे तीन अधिकृत क्रीडाप्रकार आहेत...‘टू-आर्म्ड क्लीन अँड जर्क (लाँग सायकल), ‘टू-आर्म्ड जर्क’ नि ‘सिंगल आर्म स्नॅच’...याशिवाय इतर काही प्रकारही आढळतात...
- ‘वन आर्म क्लीन अँड जर्क’मध्ये (लाँग सायकल) एका हातात गोळा धरून, तर ‘टू-आर्म्ड क्लीन अँड जर्क’ (लाँग सायकल) प्रकारात दोन्ही हातांमध्ये दोन ‘केटलबेल’ धरून दोन पायांच्या मधून झोके देऊन सुरुवात केली जाते. त्यानंतर ‘केटलबेल’ आधी छातीपर्यंत व नंतर डोक्याच्या वर उचलून धरायचा असतो. ‘केटलबेल’ खाली न ठेवता ही क्रिया 10 मिनिटांत जास्तीत जास्त वेळा करण्याचं लक्ष्य असतं...
- ‘वन आर्म जर्क’मध्ये गोळा खाली न ठेवता एका हाताने धरून छातीच्या उंचीवरून डोक्यावर नेण्याची क्रिया दिलेल्या मुदतीत शक्य तितक्या जास्त वेळा करायची असते...‘टू आर्म्ड जर्क’मध्ये याच क्रियेची दोन्ही हातांत दोन ‘केटलबेल’ धरून 10 मिनिटांत जास्तीत जास्त वेळा पुनरावृत्ती करायची असते...
- ‘सिंगल आर्म स्नॅच’मध्ये केटलबेल खाली न ठेवता दोन्ही पायांच्या मध्ये आधी झोका दिल्यानंतर थेट डोक्याच्या वर नेला जातो. ही क्रिया 10 मिनिटांत जास्तीत जास्त वेळा करायची असते. या प्रकारात फक्त एकदा हात बदलण्याची (म्हणजे उजव्याऐवजी डावा अशा प्रकारे) परवानगी असते...
- हौशी गटात महिला 16 किलो वजनाचा आणि पुऊष 24 किलो वजनाचा ‘केटलबेल’ वापरतात. व्यावसायिक श्रेणीमध्ये महिला 24 किलो, तर पुऊष 32 किलो वजनाचा गोळा वापरतात...
- यात भारत आणखी कुठं दिसणार असा जर विचार असेल, तर तो चुकीचा आहे...भारताच्या पायल कनोडियाने गेल्या महिन्यात ग्रीसमध्ये ‘आययूकेएल’द्वारे आयोजित जागतिक स्पर्धेत 30 देशांतील अव्वल खेळाडूंशी स्पर्धा करत 68 किलो वजनी गटातील 16 किलो स्नॅच स्पर्धेत पहिलं सुवर्ण आणि ‘डबल आर्म्ड लाँग सायकल’मध्ये (16 अधिक 16 किलो) दुसरं सुवर्ण पटकावलं होतं...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement
Next Article