For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवी ! 50 मीटर रायफल थ्री पोझिशन

06:30 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवी   50 मीटर रायफल थ्री पोझिशन
Advertisement

भारतानं सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक जिंकलं ते देखील चॅटॉरॉक्स येथील शूटिंग रेंजमध्ये. त्यात स्वप्नील कुसाळेनं ‘50 मीटर रायफल थ्री पोझिशन’मध्ये कांस्यपदक पटकावलं. त्यासरशी हा नेमका काय प्रकार आहे याचं कुतूहल अनेकांच्या मनात जागं झालेलं असेल. प्रत्यक्षात यात नेमबाज हा भरपूर अष्टपैलू असावा लागतो...

Advertisement

  • 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धा ही ‘नेमबाजीची मॅरेथॉन’ म्हणून ओळखली जाते. या प्रकाराला पूर्वी चार ‘फ्री रायफल’ प्रकारांपैकी एक म्हणून ओळखले जात होतं. ही 300 मीटर ‘रायफल थ्री पोझिशन’ची लघू आवृत्ती आहे...
  • नेमबाजीच्या इतर प्रकारांप्रमाणं यात घडत नाही. उलट एक स्पर्धक तीन वेगवेगळ्या स्थितीत लक्ष्य भेदण्याचा प्रयत्न करतो. यात गुडघे टेकून, पोटावर झोपून आणि उभं राहून नेम धरला जातो. याच क्रमानं या प्रकारातील स्पर्धा होते...
  • आधी पुऊषांसाठी प्रत्येक स्थितीत 40 शॉट्स आणि महिलांसाठी प्रत्येक स्थितीत 20 शॉट्स असं समीकरण ठरलं होतं. जानेवारी, 2018 मध्ये हा फरक दूर करून शॉट्सची संख्या 40×3 अशी समान करण्यात आली...
  • 50 मीटर ‘रायफल थ्री पोझिशन’ प्रकारांत पूर्वी गुडघ्यावर राहून, पोटावर झोपून अन् उभं राहून 2 तास 45 मिनिटांत हे 120 शॉट्स झाडावे लागायचे. आता यातही घट झाली असून प्रत्येक नेमबाज प्रत्येक स्थितीमध्ये 20 याप्रमाणं एकूण 60 शॉट्स झाडतो. शूटरला हे 60 शॉट्स 90 मिनिटांत पूर्ण करावे लागतात...
  • रायफलला पोटावर झोपलेल्या स्थितीत जास्त स्थिरता दिली जाऊ शकते आणि उभं राहून रायफल स्थिर ठेवणं हे मोठं आव्हानात्मक काम असतं. गुडघ्यावर राहून नेम धरताना अनेक तांत्रिक गोष्टींची काळजी घ्यावी लागत असली, तरी सर्वांत महत्त्वाचं असतं ते तोल सांभाळणं...त्यानंतर पोटावर झोपून नेम धरताना रायफल शरीराशी व्यवस्थित जुळेल याप्रमाणं धरावी लागते. शिवाय वाऱ्याचा विचार करून शॉट्स झाडावे लागतात...उभं राहून नेम धरणं ही मोठी कला. कारण त्यात पोटाच्या तसेच पायाच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवणं, स्वत:ला स्थिर ठेवणं हे सोपं नसतं. शिवाय त्यात पाठीवर भरपूर ताण पडतो...
  • नेमबाज एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जात असताना त्याला बदलासाठी वेळ दिला जातो. यात त्याला चामड्याचं जॅकेट आणि त्याची उपकरणं यांची अनुरुप रचना करावी लागते...एकूण वेळेत घट करताना या बदलास जुळवून घेण्याच्या वेळेतही कपात करण्यात आलीय. त्यामुळं खेळाडूंना निश्चित वेळेत बदल करण्याचा सराव करावा लागतो. कारण पूर्वी अधिक वेळ दिला जायचा. आता हृदयाची धडधड वाढू न देता पटकन बदल घडवावे लागतात. त्यामुळं धावाधाव वाढलीय...
  • यात ‘पाईंट 22 कॅलिबर’ची रायफल वापरली जाते...पूर्वी पुऊषांसाठी 8 किलोग्रॅमची, तर महिलांसाठी 6.5 किलोग्रॅम वजनाची रायफल वापरात आणली जायची. 2018 मध्ये तोही फरक दूर होऊन महिलांना 8 किलोग्रॅमपर्यंतची रायफल वापरण्याची परवानगी मिळाली...
  • 50 मीटर अंतरावरून नेम धरावा लागतो. ऑलिम्पिकमध्ये 60 शॉट्सनंतर सर्वोच्च गुणसंख्या असलेले आघाडीचे आठ नेमबाज अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतात...अंतिम लढतीत आणखी दहा शॉट्स झाडावे लागतात...
  • लक्ष्यामध्ये विविध गुणसंख्येची वर्तुळं असतात. अगदी मध्यभागी नेम लागल्यास कमाल 10.9 गुण मिळतात. अंतिम गुणसंख्या प्रारंभिक फेरीतील गुणसंख्येत जोडली जाते...
Advertisement
Tags :

.