महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गाला प्रीसिजनचा समभाग सूचीबद्ध : गुंतवणूकदारांना 41 टक्के परतावा

06:28 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

डिस्क आणि स्ट्रिप स्प्रिंग्ज यांची निर्मिती करणाऱ्या गाला प्रीसिजन इंजिनिअरिंगचा आयपीओ सोमवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. 529 रुपयाच्या इशू किमतीच्या तुलनेमध्ये एनएसईवर हा समभाग 721 रुपयांवर सूचीबद्ध झाला. या समभागाने 36 टक्के इतका परतावा गुंतवणूकदारांना दिला. याच दरम्यान प्रीसिजनचे बीएसई वर समभाग 750 प्रति समभाग याप्रमाणे सूचीबद्ध झाले. इशू किमतीच्या तुलनेमध्ये पाहता गुंतवणूकदारांना जवळपास 41 टक्के परतावा प्राप्त करता आला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी सदरचा समभाग हा 46 ते 53 टक्के प्रीमियम सह बाजारात लिस्ट होणार असल्याचे संकेत दिले होते. सदरच्या कंपनीच्या समभागाला गुंतवणूकदारानी दमदार प्रतिसाद नोंदवला.

Advertisement

गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

तीन दिवसांच्या गुंतवणुकीच्या कालावधीतसुद्धा गुंतवणूकदारांनी या आयपीओला उत्तम प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. रिटेल गुंतवणूकदारांनी 91 टक्के आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 414 पट आयपीओ सबक्राईब केला. पात्रताधारक संस्थात्मक खरीदेदारांनी 232 पट आणि कर्मचाऱ्यांनी 259 पट आयपीओ सबक्राईब केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article