महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘गब्बर’ इज बॅक! पण...

06:21 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निवृत्तीनंतर लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

शनिवारी (24 ऑगस्ट) रोजी शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 38 वर्षीय धवनच्या निवृत्तीची बातमी ऐकून भारतीय चाहत्यांना धक्का बसला होता मात्र आता तो पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार आहे. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी त्याने लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळण्याची घोषणा केली आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटची पुढील आवृत्ती सप्टेंबर महिन्यात सुरु होईल, ज्यामध्ये निवृत्त क्रिकेटपटूंचे संघ खेळताना दिसतील.

लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सामील होणे, हा माझ्यासाठी निवृत्तीनंतरचा सर्वात मोठा निर्णय वाटतो. क्रिकेट खेळण्यासाठी माझे शरीर अजूनही तंदुरुस्त आहे. या मी निर्णयाने खूश आहे. क्रिकेट हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, जो माझ्यापासून कधीही हिरावून घेतला जाऊ शकत नाही, असे धवनने म्हटले आहे. दरम्यान, लिजेंड्स लीगचा पुढील हंगाम सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. या स्पर्धेत निवृत्त क्रिकेटपटू खेळताना दिसतात. मागील हंगामात या लीगमध्ये युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि हरभजन सिंगसारखे अनेक भारतीय दिग्गज खेळाडू खेळताना दिसले होते. यासह या लीगमध्ये निवृत्त विदेशी क्रिकेटपटूही खेळतात.

दरम्यान, धवनच्या सहभागाने लीगमधील स्पर्धेची पातळी वाढेल आणि आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहिल्यानंतर चाहते अधिक उत्साह दाखवतील, असे लिजेंड्स क्रिकेट लीगचे सहसंस्थापक रमन रहेजा यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article