कबड्डीत जी ए विजेता
कॅम्प विभागीय स्पर्धा : सेंट्रल उपविजेता
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व सेंट पॉल्स हायस्कूल आयोजित कॅम्प विभागीय माध्यमिक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जी ए स्कूलने सेंट्रल हायस्कूलचा 2 गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. सेंटपॉल्स स्कूलच्या मैदानावरती घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जी ए स्कूलने मराठी विद्यानिकेतनचा 4 गुणांनी तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट्रल स्कूलने सरदार संघाचा सहा गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात जी ए संघाने सेंट्रल हायस्कूल संघाचा 17-15 अशा अटीतटीच्या लढतीत पराभव करून जी ए संघाने विजेतेपद पटकावले. कॅम्प विभागीय स्पर्धा सचिव अँथोनी डिसोजा, नागराज भगवंतण्णवर, एम एस मस्तीहोळी, महेश पुजारी, एन एस कामती, महेश हागिदाळे ,निरगुंडी, ग्रेसी परेरा, महेश हैबती आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या जी ए,आणि उपविजेत्या सेंटर स्कूल संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.