महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आयसीसी’कडून महिला क्रिकेटचा भावी कार्यक्रम जाहीर

06:45 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारत भूषविणार मातब्बर ऑस्ट्रेलिया, इंग्लंडविरुद्धच्या मालिकांचे यजमानपद

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) सोमवारी 2025 ते 29 साठी महिला क्रिकेट दौऱ्यांचा कार्यक्रम (एफटीपी) जाहीर करताना कसोटी सामने आणि द्विपक्षीय मालिका यांना महत्त्व दिले आहे. यात भारत मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांचे यजमानपद भूषवणार आहे. वरील मातब्बर प्रतिस्पर्ध्यांव्यतिरिक्त भारताचा सामना मायदेशात बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्याशी देखील होईल. झिम्बाब्वेला ‘एफटीपी’चे 11 वे सदस्य बनविण्यात आले आहे.

भारतीय महिला संघ या टप्प्यात न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा देखील दौरा करेल. कारण प्रत्येक सदस्य राष्ट्र मायदेशात आणि परदेशात चार मालिका खेळेल. याशिवाय 2026 च्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारत इंग्लंडमध्ये होणार असलेल्या तिरंगी मालिकेत देखील सहभागी होणार आहे. त्यातील तिसरा संघ विद्यमान टी-20 विजेता न्यूझीलंड असेल. 2026 च्या महिला टी-20 विश्वचषकाचे यजमानपद इंग्लंडला मिळालेले आहे.

सदस्यांनी यावेळी अधिक कसोटी सामन्यांवर भर दिलेला असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी बहुस्वरुपाच्या मालिका खेळण्यास सहमती दर्शविलेली आहे. यात एकदिवसीय आणि टी-20 चा समावेश असेल. ऑस्ट्रेलिया अशा प्रकारच्या मालिका सर्वांत जास्त खेळणार असून ते इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकाविऊद्ध दोन मालिका, तर वेस्ट इंडिजविऊद्ध एक मालिका खेळतील, असे आयसीसीचे क्रिकेट महाव्यवस्थापक वसीम खान यांनी स्पष्ट केले आहे.

आयसीसी स्पर्धांच्या तयारीसाठी सदस्यांनी तिरंगी मालिका खेळण्याचे मान्य केलेले आहे. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक-2026 च्या आधी इंग्लंड भारत आणि न्यूझीलंडचा समावेश असलेल्या अशा तिरंगी मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. तर आयर्लंड पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजही अनुक्रमे 2027 आणि 2028 मध्ये तिरंगी मालिकेचे यजमानपद भूषवणार आहेत, असे खान यांनी सांगितले.

या टप्प्यात संघांची संख्या वाढून 11 वर पोहोचणार आहे. कारण सध्याच्या 10 सदस्यांमध्ये झिम्बाब्वेची भर पडणार आहे. झिम्बाब्वे 2029 च्या एकदिवसीय विश्वचषकात पदार्पण करण्याबरोबर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांचे यजमानपद भूषवेल आणि भारत, न्यूझीलंड, बांगलादेश तसेच पाकिस्तानचा दौरा करेल. दरवर्षी एक तरी आयसीसी स्पर्धा होणार असून यात 2027 मध्ये प्रथमच आयोजित केल्या जाणार असलेल्या सहा संघांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश राहील.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article