महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भविष्यात योग्य धोरणे आखून विकास शक्य

10:51 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

Advertisement

पणजी : गोवा विद्यापीठात काल गुरुवारी ‘मनोहर पर्रीकर राष्ट्रीय म्यूट कोर्ट आणि पॉलिसी हेकथॉन’ परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. भविष्यात योग्य धोरणे आखून विकास शक्य आहे. कायदा हा समाजाच्या सशक्तीकरणाचे एक शस्त्र आहे. समाजाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन कायदा तयार करण्याची गरज आहे, असे यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. विकसित भारत 2047 चे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. विद्यार्थी, तरुणवर्ग हा त्यातील महत्त्वाचा दुवा आहे. त्यांच्याशिवाय ते स्वप्न साकार होणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले. सुशासन, राजकारण धोरणे या बाबतीत मनोहर पर्रीकर हे आपले आदर्श आहेत. कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. कायदा हे शस्त्र असल्याची पर्रीकरांची धारणा होती, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, गोवा विद्यापीठ कुलगुरु प्रा. हरिलाल मेनन, मनोहर पर्रीकर लॉ स्कूलचे डिन प्रा. राजेंद्र गाड व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मूट कोर्ट व परिषद दोन दिवस चालणार असून त्यात कायद्याशी संबंधित विविध विषयावर चर्चासत्रे होणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article