शुद्ध सोन्याची शवपेटी,रोल्स रॉयस कारद्वारे अंत्ययात्रा
एका इसमाला मृत्यूनंतर अशाप्रकारचा अंतिम निरोप देण्यात आला, ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. पुटुंबीयांनी रोल्स रॉयल कारवर अंत्ययात्रा काढली, जी एक आठवड्यापर्यंत वेगवेळ्या ठिकाणी भ्रमण करत राहिली. यानंतर सोन्याच्या शवपेटीत संबंधिताला दफन करण्यात आले आहे. 69 वर्षीय फ्रँक थॉम्पसन यांना त्यांच्या परिवाराने शुद्ध आणि ठोस सोन्याच्या शवपेटीत दफन केले. तसेच रोल्स रॉयलसवर एक आठवड्याची अंतिम यात्रा काढण्यात आली. थॉम्पसन हे एक सन्मानित ट्रॅव्हलर म्हणजेच जिप्पसी परिवाराचे प्रमुख होते.
थॉम्पसन यांच्यासाठी शवपेटी तयार करण्यासाठी त्यांच्या पुत्रांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. तर अत्यंयात्रेकरता कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. पित्याच्या सन्मानासमोर पैसा काहीच नाही, असे त्यांच्या पुत्रांनी सांगितले आहे. फ्रँक यांचे वयाच्या 69 व्या वर्षी फुफ्फुसातील संसर्गामुळे निधन झाले. यानंतर त्यांचा पूर्ण परिवार त्यांना सर्वश्रेष्ठ अंतिम निरोप देण्यासाठी तत्पर होता, असे त्यांच्या कौटुंबिक मित्राने सांगितले. परिवाराने एक ठोस सोन्याची शवपेटी खरेदी केली आणि एका रोल्स रॉयस कारमध्ये मृतदेह ठेवून नॉटिंघम आणि मँचेस्टरच्या अशा स्थळांकरता एक आठवड्याची अंत्ययात्रा काढण्यात आली, जेथे फ्रँक यांनी व्यवसाय आणि टारमॅक यार्ड संचालित केले होते. तसेच फ्रँक यांचे मित्र आणि कुटुंबाच्या सदस्यांना जेथे दफन करण्यात आले होते, तेथेही दौरा करण्यात आला.
संगमरमराचे थडगे
दक्षिण लंडनच्या दफनभूमीत त्यांच्या प्लॉटवर एक विशाल संगमरमराचा मकबरा तयार करण्यात येत आहे. याच्या निर्मितीकरता एक वर्ष लागणार आहे. फ्रँकला सन्मानित करणे तसेच त्यांना भव्य निरोप देण्यात येत असल्याचे दाखवून दिले गेले. त्यांच्या कुटुंबीयांनी सोन्याची शवपेटी तयार करविली होती, असे एका मित्राने सांगितले आहे.
ही शवपेटी विदेशातून मागविण्यात आली. ती पोहोचण्यास अनेक आठवडे लागले, तर फ्रँक यांच्या मृत्यूला जवळपास एक महिना होऊन गेला होता. ही प्रकिया खुपच मोठी होत गेल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. फ्रँक यांचे 2 जुलै रोजी निधन झाले होते, त्यांच्या परिवारात त्यांच्या पत्नी आणि मुले आहेत. तर अंत्यसंस्कार 23 जुलै रोजी सुरू होत 29 जुलै रोजी पूर्ण झाला. सध्या त्यांच्या थडग्याच्या चहुबाजूला संगमरमरी स्मारकाचे काम सुरू आहे. याकरता 12 महिने लागणार असल्याचे मानले जात आहे.