संत रोहिदास भवनासाठी निधी महिन्याभरात मिळेल -ॲड. अनिल निरवडेकर
चर्मकार समाज उन्नती मंडळ सावंतवाडी शाखेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ संपन्न
सावंतवाडी प्रतिनिधी
चर्मकार समाज बांधवांचे हक्काचे ओरोस येथील संत रोहिदास भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या महिनाभरात यासाठी लागणाऱ्या दीड कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून होईल. असा विश्वास माजी जिल्हाध्यक्ष ॲड .अनिल निरवडेकर यानी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.अनिल निरवडेकर यांनी समाज बांधवातील वकील,डॉक्टर पासून ते एमबीए पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत मुलांच्या यशाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे दीप प्रज्वलनाचे उद्घाटन मुंबई येथील एलआयसी अधीक्षक अभियंता रवीकिशोर चव्हाण यांच्या हस्ते झाले . यावेळी तालुका अध्यक्ष गणेश म्हापणकर , जिल्हा खजिनदार नामदेव चव्हाण, संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी वाडकर, जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर ,जिल्हा सदस्य संजना चव्हाण ,बाबुराव चव्हाण ,विनायक चव्हाण ,विजय चव्हाण, वसुंधरा चव्हाण ,दिलीप इन्सुलकर, सुरेश पवार पी बी चव्हाण, लवू चव्हाण प्रशांत चव्हाण, सुधाकर बांदेकर ,भाग्यवंत वाडीकर ,वैशाली चव्हाण ,आदी उपस्थित होते .