महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जागतिक बँकेतर्फे गोव्याला हरित ऊर्जेसाठी निधी

12:07 PM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोनापावला येथील ‘हवामान बदल’ चर्चासत्रात निर्णय : गोवा ग्रीन टुरिस्ट हॉटस्पॉट बनणार : मुख्यमंत्री

Advertisement

पणजी : जागतिक बँकेतर्फे गोवा राज्याला हरित उर्जेसाठी प्रथमच हवामान निधी (क्लायमेट फंड) मिळणार असून त्या बँकेच्या शिष्टमंडळाने त्यासाठी गोवा सरकारच्या शिष्टमंडळाशी बोलणी केली आहे. दोनापावला येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हवामान बदल’च्या विशेष चर्चासत्रात ही बोलणी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी चर्चासत्रात मार्गदर्शन केले. त्या निधीचा लाभ गोव्यातील हरित उर्जेसाठी होणार आहे. गोवा हे जागतिक नकाशावर पहिले ग्रीन टुरिस्ट हॉटस्पॉट बनणार असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला. ‘भारतीय हवामान बदल आणि विकास’ या विषयावर हे चर्चासत्र होते. त्यात जागतिक बँकेचे पथकही सहभागी झाले होते. त्या क्षेत्रातील अनेक भागीदार तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी चर्चासत्रात सहभागी झाले होते. डॉ. सावंत पुढे म्हणाले की, हवामान बदलावर आधारित गोवा राज्याचा कृती आराखडा (2023-33) तयार करण्यात आला असून तो 10 वर्षांचा आहे. हा मिळणारा निधी व त्यातून होणारा गोव्याचा विकास हे सर्व विकसित भारत, विकसित गोवा 2047 या संकल्पनेसाठी पूरक ठरणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article