For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हन्नव्वादेवी तलाव विकासासाठी दीड कोटीचा निधी

10:55 AM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्हन्नव्वादेवी तलाव विकासासाठी दीड कोटीचा निधी
Advertisement

विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची माहिती : ग्रामस्थांकडून हट्टीहोळी यांचा सत्कार

Advertisement

वार्ताहर/नंदगड

खानापूर-यल्लापूर राज्यमार्गावरील कसबा नंदगड गावाजवळ असलेल्या व्हन्नव्वादेवी तलावाच्या विकासासाठी लघुपाटबंधारे खात्यामार्फत शासनाकडून दीड कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी खानापूर दौऱ्याप्रसंगी मंगळवारी दिली. मलेनाडू विकास योजनेंतर्गत हे काम होणार आहे. त्याबद्दल कसबा नंदगड ग्रा.पं.तर्फे खानापूर दौऱ्याप्रसंगी माजी चेअरमन व विद्यमान सदस्य प्रवीण पाटील यांनी चन्नराज हट्टीहोळी यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा, सदस्य, माजी सदस्य, नागरिक, पंचायत विकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. खानापूर-यल्लापूर राज्यमार्गालगत व्हन्नव्वादेवी तलाव असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक प्रवाशांचे तलाव आकर्षण ठरले आहे.

Advertisement

तलावाच्या पाण्यावर शेकडो एकर जमीन अवलंबून आहे. तसेच हा तलाव नंदगड, कसबा नंदगड, गर्बेनहट्टीसह आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी सोयीचा असल्याने या तलावाची खोलबंदी करणे व या तलावाचा विकास व्हावा, अशी अनेक दिवसांची मागणी होती. याबाबत ग्र. पं. सदस्य प्रवीण पाटील यांनी यापूर्वी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडे तलावाच्या विकासासाठी गाऱ्हाणे मांडले होते. त्याबाबतचे निवेदन व सर्व कागदपत्रे सुपूर्द केली होती. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी या तलावाच्या विकासासाठी सरकारकडून निधी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अखेर राज्य सरकारकडून दीड कोटीचा निधी या तलावाच्या विकासासाठी मंजूर झाला आहे. कामाच्या निविदेची प्रक्रियाही सुरू आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. या तलावाच्या विकासासाठी निधी मंजूर झाल्याबद्दल कसबा नंदगडसह परिसरात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यात 59 लाखाची विकासकामे 

विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या फंडातून शासनातर्फे खानापूर तालुक्याच्या विविध गावातील विकासासाठी 59 लाखाचा निधी मंजूर करून आणला असल्याची माहिती चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली. त्यामध्ये करंबळ येथील रस्त्याच्या पेव्हर्स कामासाठी 15 लाख रु., कौलापूरवाडा येथील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी 10 लाख रु., कबनाळी येथील लिंगदेव देवस्थानजवळील समुदाय भवन बांधकामासाठी 10 लाख रु., देवलत्ती येथील यल्लम्मादेवी मंदिराजवळील सुमदाय भवनासाठी 4 लाख रु., चिक्कहट्टीहोळी येथील विरभद्र देवस्थानजवळील समुदाय भवनासाठी 10 लाख रु., निट्टूर येथील रवळनाथ देवस्थानजवळ हायमास्ट लावण्यासाठी 2 लाख रु., गणेबैल येथील लक्ष्मी देवस्थानजवळ हायमास्ट लावण्यासाठी 2 लाख रु., देवाचीहट्टी येथील विठ्ठल मंदिराजवळ हायमास्ट लावण्यासाठी 2 लाख रु., खैरवाड येथील शिवाजी चैकाजवळ हायमास्ट लावण्यासाठी 2 लाख रु., लक्केबैल चौंडेश्वरी देवस्थानजवळ हायमास्ट लावण्यासाठी 2 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी काही कामांचा शुभारंभ मंगळवारी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला.

विविध ग्रा. पं. तर्फे सत्कार

विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा खानापूर तालुक्यातील विविध ग्राम पंचायतींतर्फे ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष सत्कार केला.

Advertisement
Tags :

.