महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ईव्हीएमवर पूर्ण विश्वास : काँग्रेस खासदार चिदंबरम

06:49 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

: ईव्हीएमच्या विश्वसनीयतेवरून काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. एकीकडे काही वरिष्ठ नेते ईव्हीएमवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम यांनी आपल्याला ईव्हीएमवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएमसंबंधी प्र्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएमसंबंधी मला कुठलाच संशय नाही. पक्षातील अनेक सहकाऱ्यांचे यासंबंधीचे मत वेगळे असू शकते याची मला कल्पना आहे, परंतु 1996 पासून निवडणुकीत एक उमेदवाराच्या स्वरुपात किंवा अन्य उमेदवारांच्या एजंटच्या स्वरुपात मी भाग घेतला आहे. यातील अनुभव पाहता ईव्हीएमवरील माझा विश्वास कायम असल्याचे कार्ति यांनी बुधवारी म्हटले आहे.

Advertisement

तीन राज्यांमध्ये भाजपला विजय मिळाल्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांनी ईव्हीएमच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित केले होते. चिपयुक्त कुठलीही मशीन हॅक केली जाऊ शकते. 2003 पासूनच मी ईव्हीएमद्वारे मतदान करविण्यास मी विरोध दर्शविला आहे. प्रोफेशनल हॅकर्सना भारतीय लोकशाही नियंत्रित करण्याची अनुमती आम्ही देऊ शकत नसल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article