For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शैक्षणिक जिल्ह्यात शनिवारी पूर्ण दिवस शाळा

11:06 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
शैक्षणिक जिल्ह्यात शनिवारी पूर्ण दिवस शाळा
Advertisement

बेळगाव शहर-तालुक्यात मात्र पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी

Advertisement

बेळगाव: : मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील शाळांना सुटी द्यावी लागली होती. याची भरपाई म्हणून शनिवार दि. 10 पासून पूर्ण दिवस शाळा भरविली जाणार आहे. शैक्षणिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये जरी येत्या शनिवारपासून शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरली जाणार असली तरी बेळगाव शहर व तालुक्यात शनिवार दि. 17 पासून पूर्ण दिवस शाळा भरविली जाणार असल्याचे आदेश जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांनी बजावले आहेत. बेळगाव जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या अखेरीला जोरदार पाऊस झाला. यामुळे नद्यांना पाणी येऊन रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत येण्यासाठी अडथळे असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांनी तब्बल आठवडाभर सुटी दिली होती. या सुटीची भरपाई म्हणून शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरविण्यात येणार आहे. शनिवार दि. 10 पासून शैक्षणिक जिल्ह्यात शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरविल्या जाणार आहेत.

शिक्षक संघटनेमुळे काहीसा बदल

Advertisement

जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यासाठी आदेश बजावला होता. परंतु या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून करावी, अशी मागणी प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षणाधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यानुसार बेळगाव शहर व तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये शनिवार दि. 10 रोजी पूर्ण दिवस शाळा भरणार आहे. तर बेळगाव शहर व तालुक्यात शनिवार दि. 17 पासून पूर्णवेळ शाळा भरणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.