महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

न्यूझीलंड संघाचा भरगच्च क्रिकेट कार्यक्रम

06:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/वेलिंग्टन

Advertisement

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा आगामी उन्हाळी मौसमातील भरगच्च क्रिकेट कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमानुसार येत्या उन्हाळ्यात लंका आणि पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये वनडे मालिका खेळविल्या जातील. तसेच कसोटी मालिकाही आयोजित केल्या आहेत. चालु वर्षाअखेरीस आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप मालिकेतील न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील मालिका खेळविली जाणार आहे. क्रिकेट न्यूझीलंडने आपल्या संघाचा उन्हाळी मौसमातील क्रिकेट कार्यक्रम गुरूवारी जाहीर केला. या कार्यक्रमानुसार नोव्हेंबर अखेरपर्यंत न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद भूषविणार आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेट कार्यक्रमाला एप्रिलपासून प्रारंभ होईल, असे आयसीसीच्या सुत्राने सांगितलो.

Advertisement

28 नोव्हेंबरपासून ख्राईस्टचर्च येथे यजमान न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. ही मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत राहिल. त्यानंतर नव्या वर्षाच्या प्रारंभी न्यूझीलंड आणि लंका यांच्यात टी-20 आणि वनडे मालिका होणार आहे. मार्च महिन्याच्या मध्यंतरापासून पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील आठ सामन्यांच्या वनडे आणि टी-20 मालिका सुरू होतील.तत्पूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात द. आफ्रिका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या तिरंगी मालिका होणार आहे. ही मालिका पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपूर्वीची राहिल. न्यूझीलंडचा संघ लंकेविरुध्द सहा सामन्यांची मालिका खेळेल. याच दरम्यान त्यांचे ऑस्ट्रेलियाबरोबरचे सामने राहतील. मार्च अखेरीस न्यूझीलंड संघाबरोबर पाकची वनडे मालिका सुरू होणार आहे

न्यूझीलंडचा क्रिकेट कार्यक्रम

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article