महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

युवकांची स्वप्नपूर्ती हाच आमचा ध्यास !

06:55 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप मुख्यालयातील सभेत गर्जना : लोकांचा विश्वास भाजपवरच असल्याचा पुनरुच्चार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळविलेला प्रचंड विजय हा ऐतिहासिक आहे. हा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या श्रमाचा आणि निर्धाराचा विजय आहे. भारतीय जनता पक्षाने सातत्याने जनतेच्या हितासाठी केलेल्या कार्याचा हा विजय आहे, या विजयात युवकांचे योगदान निर्णायक ठरले असून युवकांची स्वप्ने पूर्णत्वास नेणे, हाच आमचा ध्यास आहे, असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी काढले आहेत. शनिवारी संध्याकाळी येथील भाजपच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर ते भाषण करीत होते.

तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला. त्यानंतर पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. संध्याकाळी पंतप्रधान मोदी मुख्यालयात पोहचले. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा कार्यालयात पोहचले होते. मुख्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारच्या कार्याची प्रशंसा केली.

माझ्यासाठी चारच जाती

आज देशाला जातीजातींमध्ये विभागून काही पक्ष आणि त्यांचे नेते राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, समाजात फूट पाडणाऱ्या अशा धोरणांना जनता भीक घालत नाही, हे या परिणामांवरुन दिसून येते. माझ्यासाठी भारतीय लोकांच्या, महिलाशक्ती, युवाशक्ती, गरीब आणि शेतकरी अशा चारच जाती आहेत. या चार जातींना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारने गेली दहा वर्षे अथक प्रयत्न केले आहेत. जनधन खाती, विनामूल्य गॅस कनेक्शन, घराघरात नळाचे पिण्याचे पाणी, गरीबांना घरे आणि महिलांसाठी स्वच्छतागृहे आदी योजनांमधून आम्ही गरीब आणि दुब्       ा&लांना सशक्त करत आहोत. हा विजय ही याच कार्याची जनतेने आम्हाला दिलेली पावती आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

देश प्रगत झाला, तरच...

देश प्रगत झाला तरच राज्ये प्रगत होतील. तसेच सर्वसामान्यांचीही प्रगती होईल, ही वास्तविकता आता लोकांच्या लक्षात आली आहे. आम्ही महिलांची अर्थकारणातली भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही जो शब्द लोकांना दिला, त्याचे शब्दश: पालन करणे हीच आमची गॅरेंटी आहे. या देशाच्या युवकाला आज केवळ विकास हवा आहे. या निवडणूक परिणामांच्या माध्यमातून असे स्पष्टपणे दिसून येते की, ज्या सरकारांनी युवकांच्या आकांक्षांना पायदळी तुडविले, ती सरकारे पडली आहेत. राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा येथे प्रश्नपत्रिका फुटणे, नातेवाईकशाही, भ्रष्टाचार असे प्रकार अनेक घडले. युवकांनी अशी सरकारे पाडली. आमचे सरकार युवकांना नव्या नव्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व शक्ती एकवटत आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

2024 लाही हॅट्ट्रिक होणार !

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये विजय मिळवून भारतीय जनता पक्षाने एक हॅट्ट्रिक साधली आहे. या हॅट्ट्रिकने 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीतही विजयाची हॅट्ट्रिक संपादन करण्याची गॅरेंटी दिली आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी या विजयाचे वर्णन केले.

जनतेची स्वप्ने

अपशब्द उच्चारणे, गलिच्छ भाषा करणे, खोटेनाटे आरोप करणे अशा प्रकारांना आता आम्ही थारा देणार नाही, असा संदेशच सर्वसामान्य मतदाराने या निवडणुकांच्या माध्यमातून असे प्रकार करणाऱ्या नेत्यांना दिला आहे. अशी नकारात्मक भूमिका आता जनतेला नको आहे, ही बाब आता या नेत्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. युवकांची स्वप्ने हेच माझे ध्येय आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी आपला निर्धार व्यक्त केला.

मतदारांनी नाकारली नकारात्मकता...

ड नकारात्मकता, अपशब्द आणि अवमानजनक भाषा यांना जनतेचा विरोध

ड युवकांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या सरकारांना मतदारांनी शिकविला धडा

ड भारतीय जनता पक्षावरच आपला विश्वास असल्याचे जनतेकडून पुन्हा सिद्ध

ड समाजात फूट पाडणाऱ्या शक्तींना मतदारांनी लगावली सणसणीत चपराक

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article