महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फरार लेखापाल सुरज बोर्डे अखेर गजाआड

06:11 PM Nov 27, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

एसआयटी पथकाने नगर येथून केली अटक

Advertisement

धाराशिव प्रतिनिधी

Advertisement

धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन लेखापाल सुरज संपत बोर्डे यांस एसआयटी पथकाने रविवारी मध्यरात्री अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे. धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या कथित अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये १४ ऑगस्ट २०२३ रोजी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, न.प. धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी, सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल व प्रशांत विक्रम पवार तत्कालीन लेखापरिक्षक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, त्यांनी कोणत्याही हालचाली न करता, आरोपीस अप्रत्यक्षात मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करुन प्रकरणाचा तपास डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यात डीवायएसपी स्वप्नील राठोड , सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड यांचा समावेश आहे. या पथकाने जलद गतीने चौकशीची चक्रे फिरवून आरोपी बोर्डे यास रविवारी मध्यरात्री नगर येथून ताब्यात घेतले आहे. त्यास मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. यापूर्वी बोर्डे याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विश्वास मोहिते यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. मात्र,२४ नोव्हेंबर रोजी नामंजूर केला होता.

Advertisement
Tags :
accountantACTIONCrimefugitivepolicetarunbharat
Next Article