ह्युमपार्कवर फलपुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन
01:00 PM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, फलोत्पादन खाते, बेळगाव जिल्हा फलोत्पादन संघ आणि जिल्हा कृषक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने क्लब रोडवरील ह्युमपार्क येथे 2025-26 सालातील जिल्हा पातळीवरील 66 व्या फलपुष्प प्रदर्शनाचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी, फलोत्पादन खात्याचे सहसंचालक आय. के. दोडमनी यांच्यासह फलोत्पादन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement