महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

फल-पुष्प प्रदर्शनाने वेधले लक्ष

06:22 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्यावरणप्रेमींचा प्रतिसाद : आज सांगता

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

पर्यावरणप्रेमी आणि बागायतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी भरविण्यात आलेल्या फल, पुष्प प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये शुक्रवारपासून या प्रदर्शनाला प्रारंभ झाला. यामध्ये रंगीबेरंगी रोपटी, फळे, भाजीपाला आणि फळा-फुलांपासून आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यावरणप्रेमींचे लक्ष वेधले जात आहे.

बागायत खात्यामार्फत दरवर्षी हे प्रदर्शन भरविले जाते. यामध्ये विविध सेंद्रिय खतांपासून तयार केलेली फळे-फुले आणि भाजीपालाही ठेवण्यात आला आहे. विशेषत: फळा-फुलांपासून राणी चन्नम्मांचा पुतळा, घरकुल आणि राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत.

आज सांगता

शुक्रवारपासून सुरू झालेल्या फल-पुष्प प्रदर्शनाची रविवारी सांगता होणार आहे. फल-पुष्प प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी शेवटचा दिवस असणार आहे. रात्री 9 पर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य खुले राहणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article