आदिमानवापासून मानव, आता काय होणार?
पर्वतीय भागातील वैज्ञानिक अध्ययनातून झाला खुलासा
माकड, एप, आदिमानव आणि मग मानव अशाप्रकारे उत्क्रांती झाली होती. म्हणजेच निरंतर विकास. सर्वसाधारण भाषेत सातत्याने होणारा विकास, जो भौगोलिक परिस्थिती, हवामान आणि शारीरिक गरजेनुसार होत असतो. मैदानी भागांमध्ये राहणारे लोक जेव्हा पर्वतीय भागात येतात, तेव्हा त्यांना उंचीमुळे समस्या निर्माण होतात. तर पर्वतीय भागांमध्ये राहत असलेल्या लोकांसोबत असे घडत नाही. मैदानी भागातील व्यक्ती पर्वतीय क्षेत्रात गेल्यावर त्याला धाप लागण्यास सुरुवात होते. तर पर्वतीय भागातील व्यक्तीसोबत असे घडत नाही. अलिकडेच वैज्ञानिकांनी तिबेटमध्ये राहणाऱ्या लोकांचे अध्ययन केले असून यातून अनेक हैराण करणारे खुलासे झाले आहेत.
मैदानी भागांच्या तुलनेत तिबेटच्या पर्वतांवर ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. मैदानी भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना पर्वतांवर श्वास घेण्यास त्रास होतो. हायपोक्सिया होतो. परंतु मागील 10 हजार वर्षांमध्ये पर्वतांवर राहणाऱ्या लोकांचे शरीर त्यांच्या भौगोलिक स्थिती आणि हवामानानुसार बदलले आहे.
मानवी शरीरात बदल
अमेरिकेच्या केस वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या एंथ्रोपोलॉजिस्ट सिंथिया बील यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. तिबेटचे लोक 10 हजार वर्षांमध्ये स्वत:च्या उंचीयुक्त नागरी वस्तींनुसार सरावले आहेत. त्यांचे शरीर विकसित झाले आहे. ज्या उंचीवर ते राहतात, तेथे मैदानी भागांमधील लोकांमध्ये डोकेदुखी, मोठा ताण, कानात हवेचा दाब निर्माण होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात, परंतु तेथेच राहणाऱ्या लोकांसोबत असे घडत नाही. कारण त्यांनी स्थितीनुसार स्वत:मध्ये बदल घडविले आहेत. अक्लेमेटाइज झाले आहेत.
जेनेटिक बदल
माणूस हा एकमात्र असा प्राणी आहे. जो वेगवेगळ्या भौगोलिक स्थितींनुसार स्वत:च्या शरीराला बदलत असतो किंवा विकसित करत असतो. तिबेटच्या लोकांच्या शरीरात असे जेनेटिक बदल झाले आहेत, जे त्यांना कमी ऑक्सिजन पुरवठ्यात देखली काम करण्याची क्षमता आणि शक्ती देतात. त्यांची रेस्पिरेटरी सिस्टीम आणि कार्डियोवस्कुलर सिस्टीम त्या हिशेबानुसार बदलली आहे. हीच ती उत्क्रांती असल्याचे सिंथिया यांचे सांगणे आहे.
विकसित झाली नवी क्षमता
याचमुळे पर्वतीय भागांमध्ये जन्माला येणाऱ्या मुलांच्या गुणसुत्रात हा बदल दिसून येतो. ते पर्वतांनुसार स्वत:च्या शरीरात बदलासह जन्माला आलेले आहेत. त्यांच्या शरीरात हा जेनेटिक बदल झाला आहे. याचमुळे पर्वतीय भागांच्या हवामानाचा त्यांच्यावर कुठलाच फरक पडत नाही. या मुलांमध्ये अशा प्रतिकूल स्थितींमध्ये तग धरण्याची जेनेटिक क्षमता विकसित झालेली आहे. यासंबंधीचे अध्ययन अलिकडेच प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झाले आहे.