कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संसदेपासून पहलगामपर्यंत...

06:32 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

6 दहशतवादी हल्ल्यांचा एकत्रित सूड

Advertisement

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड उगविला आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी अ•dर्यावर क्षेपणास्त्रांनी हल्ला करत 90 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तान मागील अनेक दशकांपासून भारतात दहशतवाद फैलावत राहिला आहे, यात आतापर्यंत मोठ्या संख्येत जीवितहानी झाली आहे. सरकारने बुधवारी ऑपरेशन सिंदूरनंतर एक व्हिडिओ दाखविला, ज्याद्वारे या कारवाईच्या माध्यमातून संसदेवरील हल्ल्यापासून पहलगामपर्यंतच्या 6 हल्ल्यांचा सूड उगविण्यात आल्याचे सांगितले आहे.

Advertisement

जुना हिशेब चुकता

पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधात भारताची ही सैन्य कारवाई केवळ पहलगामच्या सूडापुरती मर्यादित नसून याच्या माध्यमातून भारताने अनेक जुन्या दहशतवादी हल्ल्यांचा हिशेब चुकता केला आहे.

2008 चा मुंबईवरील हल्ला

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने मुंबईत प्रवेश करत हल्ले केले होते. या हल्ल्यात 166 जणांना जीव गमवावा लागला होता. लष्कर-ए-तोयबाचे हे सर्व दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते.

2016 चा उरी हल्ला

जम्मू-काश्मीरच्या उरी येथील सैन्यतळावर 18 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्याच्या ब्रिगेड मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, या हल्ल्यात 19 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. भारताने या हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मदला जबाबदार ठरविले होते. दहशतवाद्यांनी ग्रेनेड आणि स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा वापर केला होता.

2019 चा पुलवामा हल्ला

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. हा हल्ला भारतात करण्यात आलेल्या सर्वात घातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता.

अशाप्रकारे पाकिस्तान आणि पीओकेत सैन्य कारवाई करत भारताने केवळ पहलगाम हल्ल्याचा सूड उगविला नसून या जुन्या दहशतवादी हल्ल्यांचाही प्रतिशोध घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: या  ऑपरेशनचवे नाव ऑपरेशन सिंदूर ठेवले.  पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांना लक्ष्य करण्यात आल्याने त्यांच्या पत्नी विधवा झाल्या होत्या. अशा स्थितीत अशाप्रकारचा हल्ला केल्यावर दहशतवाद्यांना पळू जाऊ दिले शकत नसल्याचा संदेश भारताने या कारवाईच्या माध्यमातून दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article