For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बास्केटबॉलपटू ते कबड्डीचे राष्ट्रीय पंच

06:00 AM May 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
बास्केटबॉलपटू ते कबड्डीचे राष्ट्रीय पंच
Advertisement

आशुतोष साळुंखेंची भरारी : दापोली-खेड तालुक्याच्या डोईवर मानाचा तुरा,प्रो कबड्डी, महाकबड्डी सिझनमध्येही पंच म्हणून  सहभाग

Advertisement

कोणत्याही खेळाला, स्पर्धेला पंचांची भूमिका महत्वाची मानली जाते. कारण पंचांचा निर्णय स्पर्धेतील विजेता व उपविजेता ठरवत असतो. त्यामुळे खेळाडूंप्रमाणे पंचाची भूमिका निर्णायक ठरत असते. या बास्केटबॉलसारख्या खेळात यश मिळविल्यानंतर कालांतराने कबड्डीचे राष्ट्रीय पंच म्हणून दापोली, खेडचा झेंडा राष्ट्रीय स्तरापर्यंत आशुतोष साळुंखे फडकवत आहेत. खेड तालुक्यातील व दापोलीत शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या आशुतोष साळुंखे यांनी महाविद्यालयातून बास्केटबॉल अशा विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेत त्यांनी राष्ट्रीय पंच म्हणून मजल मारत यशाचा झेंडा फडकवला आहे. यामुळे दापोली व खेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर कोरले जात आहे.

लहानपणापासून आशुतोष यांना कबड्डी, क्रिकेट अशा विविध खेळ प्रकारांची प्रचंड आवड, शैक्षणिक कालावधीत पुस्तकी शिक्षणाप्रमाणे ते मैदानी खेळांचाही आनंद लुटत असत. त्यामुळे त्यांना क्रीडा प्रकाराची फार आवड निर्माण होवून ते महाविद्यालयात असताना कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ अंतर्गत बी. पी. एड. कॉलेज मिरजकडून इंटरझोनपर्यंत इचलकरंजी येथे खेळले व यश आपल्या टीमच्या पदरात पाडून घेतले. क्रिकेट, कबड्डी, खो-खो, कॅरम, स्वीमिंग या स्पर्धांमध्ये त्यांनी अनेकवेळा सहभाग नोंदवून यश मिळवले.

Advertisement

आशुतोष हे खेड तालुक्यातील चिंचघर-प्रभूवाडी येथील रहिवासी आहेत. परंतु ते दापोली पंचनदी येथील श्री य. रा. कुटरेकर माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. बास्केटबॉल अशा विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवत त्यांनी कबड्डीत अधिक रुची निर्माण झाली. त्यांनी कबड्डी क्रीडा प्रकाराचा अभ्यास करत छोट्या-मोठ्या स्पर्धांचे पंच म्हणून संधी मिळत गेली. गावस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय अशा स्पर्धांचे परीक्षण केले. त्यानंतर त्यांच्या क्रीडा प्रकारातील परीक्षणाच्या असलेल्या अभ्यासाच्या जोरावर, कौशल्यावर त्यांनी राष्ट्रीय पंच म्हणून परीक्षा देत उत्तीर्ण होत राष्ट्रीय-राज्यस्तरीय होणाऱ्या प्रो-कब•ाr स्पर्धेचे पंच म्हणून आज आशुतोष साळुंखे यांनी मजल मारली असल्याचे ते सांगतात.  तालुकास्तरावर 450, जिल्हास्तरावर 80 तर राज्यस्तर 35 सामन्यांमध्ये त्यांनी पंच म्हणून काम पाहिले

आशुतोष हे कबड्डीचे राष्ट्रीय पंच, प्रो कब•ाr पंच, एम. के. एल. महा-कबड्डी लीग पंच तर खो-खो, डॉजबॉलचे महाराष्ट्र राज्य पंच आहेत. त्यांनी 2010 मध्ये रत्नागिरी जिल्हा कबड्डी पंच, 2012 मध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच, 2015 मध्ये राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण केल्या. प्रो कबड्डीमध्ये सिझन 7 ते 11 एकूण 5 सिझन प्रो-कबड्डी स्पर्धेत पंच म्हणून सहभाग घेतला. मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर, पंचकुला, अहमदाबाद, नोएडा, बेंगळूर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता इत्यादी ठिकाणी पंच म्हणून कामगिरी केली. महाकबड्डी मध्ये सिझन 2 मध्ये व 2016 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे झालेल्या स्पर्धेत पंच म्हणून सहभाग घेतला.

- प्रतिक तुपे, दापोली

Advertisement
Tags :

.