For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रित्झ पराभूत, फोकिना, फोन्सिका विजयी

06:50 AM Feb 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
फ्रित्झ पराभूत  फोकिना  फोन्सिका विजयी
Advertisement

वृत्तसंस्था/डिलेरी बीच

Advertisement

येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील डिलेरी बिच खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या आठव्या मानांकित फोकिनाने अमेरिकेचा टॉपसिडेड टेलर फ्रित्झचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे ब्राझीलच्या फोन्सिकाने अर्जेटिनाच्या नेव्हानोचा ब्युनोस आयरीस टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना अडीच तासाच्या लढतीत पराभव केला.

डिलेरी बिच स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आठव्या मानांकित फोकिनाने टेलर फ्रित्झचा 7-6 (7-4), 7-6 (7-5) असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. या सामन्यात फ्रित्झने 13 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. दुसऱ्या एका सामन्यात इटलीच्या चौथ्या मानांकित मॅटो अर्नेल्डीने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना अमेरिकेच्या सहाव्या मानांकित ब्रेन्डॉन नाकाशीमाचा 7-6 (7-2), 6-4 असा पराभव केला. आता अर्नेल्डी आणि फोकिना यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. सर्बियाच्या केमॅनोव्हिकने अमेरिकेच्या गिरॉनवर 2-6, 6-4, 6-2 अशी मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या लढतीत दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी 12 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. तृतिय मानांकित अॅलेक्स मिचेलसेनने ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीचा 7-6 (7-3), 7-5 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. ब्राझीलच्या 18 वर्षीय फोन्सिकाने तब्बल अडीच तासाच्या लढतीत अर्जेटिनाच्या नेव्होनीवर 3-6, 6-4, 7-5 अशी मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. फोन्सिका या सामन्यात 10 बिनतोड सर्व्हिस केली. सर्बियाच्या डिजेरीने ब्राझीलच्या वॉईल्डचा 7-6 (7-3), 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत गाठली.

Advertisement

व्हेरेव्ह, मुसेटी पराभूत

मार्सेलीमध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत अर्जेटिनाच्या सेरुनडोलोने जर्मनीच्या व्हेरेव्हचा 3-6, 6-3, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. इटलीच्या मुसेटीने पायाला झालेल्या दुखापतीमुळे सामनाअर्धवट सोडल्याने स्पेनच्या मार्सेलीला पुढे चाल मिळाली. रशियाचा टॉपसिडेड मेदव्हेदेव आणि फ्रान्सचा हंबर्ट यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. मेदव्हेदेवने जर्मनीच्या स्ट्रफचा 6-3, 6-4, हंबर्टने इटलीच्या सोनोगोचा 6-4, 6-3, सर्बियाच्या मेजेडोव्हीकने जर्मनीच्या अल्टमेअरचा 7-5, 6-7 (5-7), 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्वफेरी गाठली आहे. बेल्जीयमच्या बर्जेसने उपांत्यफेरी गाठली आहे. हंबर्ट आणि बर्जेस यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. चीनच्या झेंगने दुखापतीमुळे माघार घेतल्याने बर्जेसने पहिला सेट 7-5 असा जिंकून शेवटच्या चार खेळांडूत स्थान मिळविले.

Advertisement
Tags :

.