For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाळकरी मुलांची व्यसनांशी मैत्री! शिक्षणा ऐवजी गिरवले जात आहेत व्यसनाचे धडे

12:52 PM Dec 18, 2023 IST | Kalyani Amanagi
शाळकरी मुलांची व्यसनांशी मैत्री  शिक्षणा ऐवजी गिरवले जात आहेत व्यसनाचे धडे
Advertisement

गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाढता कल : शिक्षकांची आदरयुक्त्त भिती होतेय कमी: अनभिज्ञ पालकांनी सजग राहण्याची गरशाळकरी मुलांची व्यसनांशी मैत्री! शिक्षणा ऐवजी गिरवले जात आहेत व्यसनाचे धडे

Advertisement

कृष्णात चौगले / कोल्हापूर

अविचारी वय, जाहिराती व माध्यमांचा प्रभाव, संगतीचा परिणाम, एकदा चव घेण्याचा मोह, पालकांचे दुर्लक्ष आदी अनेक कारणांमुळे १० ते १६ वयोगटातील शाळकरी मुलांच्या हातात सिगरेट अन् गांजा दिसू लागला आहे. तंबाखू, गुटखा, पान मसाला, सिगारेट व गांजाच्या व्यसनाचे प्रमाण वाढल्याचे अनेक स्वयंसेवी संस्थांना आढळले आहे. कोवळ्या वयात अशा व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे ३० ते ३५ वयोवर्षांतील कॅन्सर पेशंटच्या संख्येत वाढ झाल्याचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

Advertisement

गेल्या काही वर्षांपासून शहरी भागातील शाळांमधील मुलांमध्ये व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात मात्र हे प्रमाण अत्यल्प होते. पण आता ग्रामीण शाळांमधील मुलांच्या हातामध्येही सिगारेट, गांजासह अन्य अंमली पदार्थ दिसू लागले आहेत, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेले काही व्यसनाधीन युवकच अनेक शाळकरी मुलांचे आदर्श बनत चालले असून त्यांचे अनुकरण केले जात आहे. त्यामुळे गावातील अडगळीतील आणि निर्जन जागा या मुलांचे स्मोकींगचे अड्डे बनले आहेत. त्यामुळे शाळेत कमी आणि स्मोकींगच्या अड्यावर जादा ही मुले दिसत आहेत. त्यांचा मुलगा शाळेत सतत गैरहजर राहत असल्याबद्दल ज्यावेळी शिक्षक पालकांना सांगतात, त्यावेळी तो कोठे जातो आणि काय करतो ? याचा शोष घेतला जातो. तोपर्यंत त्यांचा मुलगा पूर्णपणे व्यसनामध्ये गुंतलेला असल्याचे पालकांना आढळते. त्यांच्यामध्ये व्यसनाबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्ती देखील बळावत चालल्यामुळे त्यांच्या संगतीमुळे शाळेतील अन्य मुलेही घडण्याऐवजी बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही मुलांनी तर दप्तरातून शस्त्रे आणल्याचे प्रकार शिक्षकांनी पालकांना सांगितले आहेत. व्यसनाचा हा टप्पा प्राथमिक अवस्थेतील असला तरी त्यातून संबंधित मुलांना बाहेर काढण्याचे पालक आणि शिक्षकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामध्ये गरीब-मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना सिगरेट, गांजा तंबाखू, गुटखा, सुगंधी पानमसाला यांचे तर उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये सिगारेट, गांजाचे व्यसन मोठ्या प्रमाणावर असल्याचे स्वयंसेवी संस्थांच्या निदर्शनास आले आहे. त्यामागे मित्रांची संगत तसेच तंबाखूजन्य पदार्थांची सहजपणे उपलब्धता ही कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गंमत म्हणून केलेले 'व्यसन' बनते 'गरज'

शाळकरी मुले सुरवातीला सहजपणे गंमत म्हणून विविध व्यसनाकडे वळतात. नंतर व्यसने ही त्यांची गरज होते. कालांतराने हे विद्यार्थी व्यसनांच्या पूर्णपणे आहारी जातात. इंटरनॅशनल टोबॅको कंट्रोल पॉलिसी इव्हॅल्यूएशन प्रोजेक्ट अंतर्गत मध्यंतरी एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. एकदा तंबाखू किंवा सिगारेटचे व्यसन लागले तर ७२ ते ९४ टक्के व्यक्ती तंबाखू सोडण्यास तयार नसतात, असे त्यात नमूद होते. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी मुलांना व्यसनाधिनतेपासून मुक्त
करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहे. धुम्रपान व तंबाखूच्या व्यसनापासून विद्याथ्यचि रक्षण करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. कोवळ्या वयात तंबाखूचे व्यसन जडल्यामुळे ३० ते ३५ वयोगटातील युवकांना कॅन्सर झाल्याचे आढळून येत आहे.

पालकांच्या दुर्लक्षामुळे अनेक शाळकरी मुले बेलगाम

पालकांनी आपला मुलगा दररोज येळेत शाळेत जातो का, तो कोणत्या मुलांच्या संगतीत आहे, त्याच्या वर्तनातील बदल, त्याच्या वर्तणूकीबद्दल शिक्षक अथवा शाळेतील अन्य मुलांकडे विचारपूस करणे आवश्यक आहे. पण काही कुटुंबांमध्ये वडील अथवा घरातील अन्य सदस्यच व्यसनी असल्यामुळे साहजिकच किशोरवयीन मुलांकडून व्यसन करण्याचा आदर्श घेतला जातो. पालकच व्यसनी असल्यामुळे त्यांच्याकडून मुलांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे बेलगाम झालेली मुले अगदी सहजपणे व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत. याशिवाय अनेक कुटूंबांमध्ये संस्कारक्षम पालक असून देखील निव्वळ त्यांनी मुलांकडे केलेल्या दुर्लक्षामुळेही अनेक मुले व्यसनाच्या गर्तेत सापडली आहेत. त्यामुळे आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर पालकांनी देखील स्वतः निर्व्यसनी असणे अपेक्षित आहे.

शिक्षकांनी १५ दिवसांतून एकदा दप्तरची तपासणी करावी

पालकांनी सजगपणे आपल्या पाल्याकडे वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षकांनी किमान १५ दिवसांतून एकदा आपल्या शाळेतील मुलांच्या दप्तरची तपासणी करून त्यामध्ये सिगरेट, तंबाखू अथवा व्यसनाच्या अन्य मादक पदार्थासह तीक्ष्ण हत्यारे सापडतात का ? हे पाहणी गरजे आहे. तसेच शाळेतील बाथरूम आणि अडगळीच्या जागा तपासण्याची गरज आहे. विशेषतः मुलांना दुपारनंतर थकवा येत असल्यामुळे त्यांच्यावर शिक्षकांनी दुपारनंतर लक्ष ठेवावे, यामध्ये व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांना चांगले काय ? वाईट काय ? याची जाणिव करून देऊन त्यांना व्यसनापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. या सर्व सूचना देणारे परिपत्रक नुकतेच सर्व शाळांना पाठवले आहे.

एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि.प.कोल्हापूर

Advertisement
Tags :

.