For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime : सांगलीत दारु पिण्याच्या वादातून मित्राचा निघृण खून

01:00 PM Oct 19, 2025 IST | NEETA POTDAR
sangli crime   सांगलीत दारु पिण्याच्या वादातून मित्राचा निघृण खून
Advertisement

          नशेत झालेल्या वादातून दगडाने ठेचून तरुणाचा खून

Advertisement

सांगली : सांगली पिण्यास बसल्यानंतर नशेत झालेल्या वादानंतर रोहित लक्ष्मण आवळे (वय २४, रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी) याचा दगडाने ठेचून निघृण खून करण्यात आला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास वसंतदादा वसाहतीमध्ये बंद पडलेल्या एका कारखान्यात हा खून झाला. हा खून आवळे याच्या मित्रानेच केला आहे.

याप्रकरणी मित्र संशयित आदेश मधुकर डोईफोडे (वय २४, रा. चिंतामणीनगर, झोपडपट्टी) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मृत रोहित आवळे हा मजुरीचे काम करतो. तसेच संशयित आदेश हा देखील एका किराणा दुकानात मजुरीचे काम करत होता. दोघेही एकाच झोपडपट्टीत राहत होते.

Advertisement

त्यामुळे त्यांची चांगली ओळख होती. तसेच ते दोघे एकमेकांचे मित्रही होते. पण दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता अशी परिसरात चर्चा होती. शुक्रवारी रात्री रोहित, आदेश आणि परिसरातील चौघे दारू पिण्यासाठी एकत्र जमले होते.

वसंतदादा औद्योगिक वसाहतीमध्ये उडपी हॉटेल आणि बीएसएनएलच्या ऑफीसजवळ एका पडक्या कारखान्यासमोर अंधारात बसून चौघांनी दारु प्यायली. त्यांच्यात गप्पा सुरू होत्या. काहीवेळानंतर दोघे साथीदार निघून गेले. रोहित आणि आदेश हे दोघेच थांबले होते. नशेत असताना त्यांच्यात वादावादी झाली. बाद वाढत गेल्यानंतर एकमेकांना ठेवत नाही अशी धमकी दिली.

तेव्हा आदेशने रोहितला मारहाण करण्यास सुरूवात केली. तो खाली पडल्यानंतर दगडाने त्याचे डोके ठेचले. तो निपचिप पडल्यानंतर आदेश तेथून पळून गेला. याच दरम्यान वसाहतीमध्ये रात्रपाळीला असलेल्या काही कामगारांना या दोघांचा गोंधळ ऐकू आला. त्यामुळे परिसरात गर्दी जमली. मध्यरात्रीनंतर सव्वाच्या सुमारास संजयनगर पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी औद्योगिक वसाहतीमधून जात होती.

तेव्हा त्यांना बीसएनएल ऑफीसजवळील बंद पडलेल्या कारखान्यासमोर गर्दी दिसली. त्यामुळे पोलीस तेथे आले. त्यांनी गर्दी हटवली. पाहणी केल्यानंतर मृत तरूण पालथ्या स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. बाजूलाच रक्ताने माखलेला दगड पडला होता. चौकशी केल्यानंतर मृत तरूणाचे नाव रोहित आवळे असल्याचे समजले. संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम यांना हा प्रकार कळवला. ते घटनास्थळी दाखल झाले.


यानंतर  मृताच्या नातेवाईकांना कळवले. संशयिताचा शोध घेण्यास पोलीस पथके रवाना झाली. संजयनगर पोलिसांनी तातडीने चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत आदेश डोईफोडेने वादातून खून केल्याची कबुली दिली. त्याला अटक केली. इतर दोघांचा खुनात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. परंतु त्यांची कसून चौकशी करून जबाब नोंदवले आहे. आदेशला दोन दिवसाची कोठडी सुनावली आहे.

Advertisement
Tags :

.