For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मित्रानेच मुलीचा घात केल्याचा आरोप

11:31 AM Jul 04, 2025 IST | Radhika Patil
मित्रानेच मुलीचा घात केल्याचा आरोप
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

रत्नदुर्ग किल्ल्याच्या सनसेट पॉईंटवरून समुद्रात उडी घेतलेल्या बेपत्ता तरुणीच्या वडिलांनी तिच्या मित्रावर गंभीर आरोप केले आहेत़ संबंधित तरुण हा आपल्या मुलीला सातत्याने फोन करत होत़ा तिला जर आत्महत्या करायची असती तर तिने नाशिकमध्येच केली असती. ती रत्नागिरीत कशाला येईल़ तिच्या मित्रामुळेच तिचा घात झाला असल्याचा गंभीर आरोप तरुणीच्या वडिलांनी केला आहे. सदर तरुण नाशिक येथून बेपत्ता असल्याची तक्रार 30 जून रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

सनसेट पॉईंटवरुन उडी घेतल्यानंतर बेपत्ता असलेल्या तरुणीचे वडील व भाऊ गुरुवारी रत्नागिरीत दाखल झाले होत़े यावेळी पोलिसांसमवेत त्यांनी सनसेट पॉईंटला भेट दिल़ी घटनास्थळी दाखल होताच तिच्या वडिलांना अश्रु अनावर झाल़े यावेळी पत्रकारांसमोर त्यांनी आपली व्यथा मांडल़ी तसेच अनेक प्रश्न उपस्थित केल़े आपली मुलगी आत्महत्या करणारी नव्हत़ी तिला जर असे टोकाचे पाऊल उचलायचे असते तर ती रत्नागिरीत कशाला आली असत़ी संबंधित तरुण हा तिला सतत फोन करत होत़ा त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक केले. तिच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न केल़ा यानंतर तिचे काहीतरी बरे-वाईट केले, असा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला.

Advertisement

  • नाशिक येथील घरी सापडली चिठ्ठी

बेपत्ता तरुणी नाशिक येथे बँकेत कामाला होत़ी येथे ती राहत असलेल्या घरी पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आल़ी यावेळी तिने आपल्या व्यथा चिठ्ठीत मांडल्या होत्य़ा त्यानुसार मी संकटात सापडले असून मी काय करु मला समजत नाही, असे मत मांडले होत़े यावरुन ती एका वेगळ्या मानसिक स्थितीतून जात असल्याचे समजून येत आह़े मात्र वडिलांच्या मते माझी मुलगी कोणत्याही स्थितीत आत्महत्या करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आह़े पोलिसांकडून तरुणीचे कॉल डिटेल्स, तिच्या संपर्कातील व्यक्ती आदींची चौकशी सुरु केली आह़े मात्र अद्याप ठोस काही हाती लागले नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी रत्नागिरीत बँक कर्मचारी असलेल्या तरुणीच्या मित्राची रत्नागिरी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी चौकशी केली आहे.

  • ड्रोनच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न

सनसेट पॉईंटवऊन 29 जून रोजी बेपत्ता झालेल्या तऊणीचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाह़ी पोलिसांकडून सर्व ते शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत़ समुद्रात तऊणीचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आह़े तसेच एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आले आह़े त्याचप्रमाणे समुद्री किनाऱ्यावर गस्त ठेवण्यात येत आह़े

  • वडिलांनी चप्पल, ओढणी ओळखली

तऊणीने आत्महत्या करण्यापूर्वी चप्पल व ओढणी घटनास्थळी काढून ठेवली होत़ी गुऊवारी तऊणीचे वडील रत्नागिरीत आल्यानंतर त्यांना चप्पल व ओढणी दाखविण्यात आल़ी यावेळी चप्पल व ओढणी आपल्याच मुलीची असल्याचे तऊणीच्या वडिलांकडून पोलिसांना सांगण्यात आल़े

Advertisement
Tags :

.